पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan Vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी (7 ऑक्टोबर) रोजी आमने-सामने असणार आहेत. पहिला कसोटी सामना मुल्तान येथे रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान कर्णधार शान मसूदने (Shan Masood) मोठे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघात काही काळापासून खळबळ उडाली आहे. आता नुकताच टी20 आणि एकदिवसीय फाॅरमॅटचा कर्णधार असलेल्या बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी बांगलादेश विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तान येथे खेळली गेली. ही मालिका पाकिस्तानने कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखाली 2-0 ने गमावली. बांगलादेशविरूद्ध पाकिस्तानने पहिलीच कसोटी मालिका गमावली, त्यावेळी देखील संघातील वातावरण बिघडल्याचे दिसले होते.
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार शान मसूद (Shan Masood) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, “खेळाडूंमध्ये खूप दुःख आहे. 2024 हे पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले वर्ष राहिले नाही. आम्हाला आमच्या चाहत्यांना आनंदी पाहायचे आहे. धर्मानंतर क्रिकेट पुढे येते. याकडे सर्वांचे लक्ष आहे, त्यामुळेच आम्ही दुःखी आहोत. याचे उत्तर सकारात्मकच द्यावे लागेल. आम्ही भूतकाळ सोडून देतो. आम्ही संघातील निवडीतबाबत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे बोलताना मसूद म्हणाला, “मुल्तान हे आमच्यासाठी नवीन मैदान आहे. जेव्हा आम्ही रावलपिंडीत बांगलादेशसोबत खेळलो, तेव्हा आम्ही तिथे भरपूर क्रिकेट खेळलो होतो, त्यामुळे खेळपट्टीवर गवत सोडले तर ती कशी असेल? हे आम्हाला माहीत होते. बांगलादेशविरुद्धचा सामना फलंदाजांसाठी थोडा कठीण होता.”
मसूद इंग्लंडच्या बेसबॉल खेळाचे कौतुक करताना म्हणाला की, “त्यांचा (बेसबॉल) जगावर परिणाम झाला आहे. काही वेळा आपण काम करण्याच्या सेट पद्धतींमध्ये अडकतो. त्यामुळे इंग्लंडने केलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट ही आहे. मुख्य म्हणजे काही गोष्ट करण्याचे नवीन मार्ग शोधणे. क्रिकेट यापेक्षा वेगळे नाही. हे जीवनासारखे आहे. तुम्ही नवीन मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करा आणि इंग्लंड यामध्येच आक्रमक आहे.”
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन- सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; पदार्पण सामन्यातच ‘या’ स्टार खेळाडूने रचला इतिहास!
IND vs PAK; भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून शानदार विजय
धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? या दिवशी जाहीर होईल निर्णय