पाकिस्तान क्रिकेट संघ बऱ्याच काळापासून सामने हरत आहे. त्यांना एकापाठोपाठ एक अनेक सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे संघात सातत्यानं बदल होत आहेत.
अलीकडेच बाबर आझमनं मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता बातम्या येत आहेत की, त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब झाली आहे. यामुळे त्याला काढून टाकलं जाऊ शकतं.
शान मसूदच्या नेतृत्वाखाली मुलतानमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं . इंग्लंडनं पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा आणखी एक लाजिरवाणा पराभव आहे. याआधी त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 0-2 ने हरला होता. यामुळे शान मसूदच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले. विशेष म्हणजे, संघाला या सहाही सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. यावरून कर्णधार म्हणून शान मसूदचा रेकॉर्ड किती वाईट आहे हे दिसून येतं. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतरच मसूदला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत होती. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याला कायम ठेवलं. मात्र आता पाकिस्तानी मीडियानुसार, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर शान मसूदला कर्णधारपदावरून हटवण्यात येऊ शकतं. ‘समा टीव्ही’नुसार, सौद शकील, मोहम्मद रिझवान आणि सलमान आगा यांच्यापैकी कोणी एक पाकिस्तानचा पुढील कसोटी कर्णधार बनू शकतो.
मुलतान कसोटी सामन्यात पाकिस्ताननं पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडनं चोख प्रत्युत्तर देत पहिला डाव 7 बाद 823 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला पाकिस्तान संघ केवळ 220 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे त्यांना एक डाव 47 धावांच्या मोठ्या फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचा –
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे हे 5 लाजिरवाणे रेकॉर्ड, एकदा वाचाच!
WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या
पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव