---Advertisement---

शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 1:51 PM
Shane Bond
---Advertisement---

युनायटेड अरब अमिराती टी20 लीगमधील (यूएई टी20) मुंबई इंडियन्सची मालकी हक्क असलेल्या एमआय एमिरेट्स फ्रँचायझीने त्यांच्या प्रशिक्षण स्टाफची घोषणा केली आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) मुंबई इंडियन्सने झहीर खान आणि माहेला जयवर्धने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. तर गुरुवारी (15 सप्टेंबर) एसए20 लीगच्या लिलावापूर्वी एमआय केपटाउनने मुख्य प्रशिक्षकापासून ते फलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि जनरल मॅनेजरची नावे जाहीर केली असून आता एमआय एमिरेट्सचा प्रशिक्षक स्टाफ जाहीर केला आहे.

न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज शेन बाँड हे एमआय एमिरेट्सचे (MI Emirates) मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. तर फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेल यांची नियुक्ती केली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार आणि न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलिन यांच्यावर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी दिली आहे. तसेच भारताचे रॉबिन सिंग अष्टपैलू रॉबिन सिंग हे संघाचे जनरल मॅनेजर असतील.

बाँड यांनी 2015मध्ये एमआयमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईसोबत 4 आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

एमिरेट्स हा संघ अबुधाबीत स्थित असेल आणि त्यामध्ये माजी एमआय खेळाडू तसेच काही नवीन खेळाडूही समाविष्ट करण्यात आले आहेत. कायरन पोलार्ड, ड्वेन ब्रावो, निकोलस पूरन आणि ट्रेंट बोल्ट हे पहिल्या हंगामात एमआय एमिरेट्सचा भाग असतील.

मुंबई इंडियन्स आणि एमआय एमिरेट्स संघांचे मालक आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “मी शेन, रॉबिन, पार्थिव, विनय आणि जेम्स यांचे एमआय एमिरेट्समध्ये त्यांच्या नवीन भूमिकेसाठी स्वागत करतो. विविध कालावधीसाठी एमआयचा अविभाज्य भाग राहिल्यामुळे, कोचिंग टीम एमआयला बनवणाऱ्या मूल्यांमध्ये अपवादात्मकपणे पारंगत आहेत. मला खात्री आहे की ते उत्साही एमआय चाहत्यांना आकर्षित करणारा संघ एमआय एमिरेट्स तयार करू शकतील.”

याबरोबरच मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि झहीर खान यांच्यावर नवीन जबाबदारी आहे. मुंबई इंडियन्ससह आंतरराष्ट्रीय लीग टी20 मध्ये एमआय इमिरेट्स आणि दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये एमआय केपटाउन या दोन फ्रँचायझींच्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी जयवर्धने कार्यरत असतील. त्यांना ग्लोबल हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्त (Global Head of Performance) करण्यात आले आहे.

जयवर्धने यांच्याबरोबरच झहीर खान यांच्यावरही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झहीर यांना मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट (Global Head of Cricket Development) बनवण्यात आले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा कर्णधार बनल्यानंतर संजूने दिली पहिली प्रतिक्रिया, राहुल-पंतबद्दलही लक्षवेधी भाष्य
भारतासह ‘हे’ 4 संघ गाठू शकतात टी20 विश्वचषकाची सेमीफायनल, दिग्गजाला आहे विश्वास
बापरे! दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सनी भरलेल्या विमानाचे इंजिन फेल, मोठा अपघात…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---