क्रिकेटविश्वाला ४ मार्च रोजी मोठा धक्का बसला तो महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाच्या बातमीने. वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नने सर्वांचा निरोप घेतला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकांनी त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. तसेच त्याच्याबद्दलच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्याचे अनेक रंजक किस्सेही चर्चेत आले. असाच एक किस्सा घडला होता, तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी.
खरंतर शेन वॉर्न (Shane Warne) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यात मैदानात काट्याची टक्कर असायची, पण मैदानाबाहेर हे दोन्ही खेळाडू चांगले मित्र होते. तर झाले असे की, १९९८ साली ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी वॉर्न मुंबईत असताना सचिनच्या घरी गेला होता. सचिनने त्याला जेवणासाठी आग्रह गेला. त्यावेळी वॉर्नला मसालेदार चिकन वाढण्यात आले. पण, मसालेदार पदार्थ वॉर्न खाऊ शकत नव्हता. हा किस्सा वॉर्नच्या ऍमेझॉन प्राईमवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सांगण्यात आला आहे.
वॉर्नने सांगितले होते की, ‘सचिन आणि माझे चांगले संबंध होते. आम्ही चांगले मित्र होतो आणि आजही आहोत. ती मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऐवजी वॉर्न विरुद्ध सचिन अशीच समजली जात होती. सर्वांना आमच्यातील सामना पाहायता होता. त्यावेळ मी त्याच्या घरी गेलो होतो. मला वाटले होते की मी जेवून परत हॉटेलवर येईल. मी चिकनचा छोटा तुकडा खाल्ला आणि माझं डोकंच गरगरलं. मी त्या तुकड्याला चावत होतो आणि माझे डोके गरगरत होते. माझ्या मनात सचिन आणि त्याच्या कुटुंबाबद्दल फार आदर होता.’
याच घटनेबद्दल सचिनने सांगितले होते की, वॉर्न मसाला बिलकूलच खाऊ शकत नव्हता. त्याने सांगितले, ‘मी पाहत होतो की, वॉर्न सातत्याने माझ्या मॅनेजरबरोबर बोलत होता. माझ्या मॅनेजरने मला सांगितले होते की, शेनने काही खाल्ले नाही. मी बाकी पाहुण्यांच्या पाहुणचारामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे मला कळाले नव्हते. तेव्हा मला कळाले की, शेन वॉर्न मसालेदार जेवण करू शकत नाही. त्याला मला निराश करायचे नव्हते, पण तो माझ्या मॅनेजरला म्हणत होता की, ‘हेल्प मी’. त्यानंतर संध्याकाळी शेन माझ्या घरी किचनमध्ये गेला आणि सॉसेज अँड बीन्स आणि स्मॅश पोटॅटो बनवले. असा होता शेन वॉर्न.’ (Shane Warne cooked for himself at Sachin Tendulkar place)
वॉर्नने थायलंडमधील आपल्या प्रायवेट विलामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी तो तिथे त्याच्या मित्रांसह सुट्टांचा आनंद घेण्यासाठी गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
WIvENG| लाजिरवाण्या सुरुवातीनंतर बेअरस्टोची शतकी झुंज; पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड ६ बाद २६८
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर