भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा सोमवारी (८ फेब्रुवारी) चौथा दिवस पार पडला. इंग्लंडने भारतासमोर ४२० धावांचे आव्हान दिले.
या धावांचा पाठलाग करत असताना भारताने चौथ्या दिवसाखेर १३ षटकात १ बाद ३९ धावा केल्या आहेत. मात्र, सामन्यावर वर्चस्व गाजवत असलेल्या इंग्लंड संघाच्या काही निर्णयांवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न नाराज दिसला. ट्विट करत त्याने आपली नाराजी जाहीर केली.
इंग्लंडला मिळाली आघाडी
तिसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या भारताच्या रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर यांनी चौथ्या दिवसाची सुरुवात केली. अश्विन ३१ धावा काढून बाद झाल्यानंतर सुंदरने नाबाद ८५ धावा करत अखेरपर्यंत किल्ला लढवला. भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आल्याने इंग्लंडला २४१ धावांची आघाडी मिळाली.
इंग्लंडने घेतला दुसऱ्यांदा फलंदाजीचा निर्णय
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारतीय संघाला फॉलोऑन देण्याची संधी इंग्लंडकडे होती. मात्र, त्यांनी दुसऱ्यांना फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात अतिशय संथगतीने फलंदाजी केली. या निर्णयावर दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न नाराज दिसला.
त्याने ट्विट करत म्हटले, “इंग्लंड संघाला अजूनही वाटत आहे की आपण हा सामना हरला नाही पाहिजे. त्यांची शैली दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्यावरच दबाव आणणारा होता. इंग्लंड संघाने अतिशय काळजीपूर्वक खेळण्याचा प्रयत्न केला. यातून संघाची भेकड वृत्ती दिसली.”
इंग्लंडची दुसऱ्या डावात अवसानघातकी फलंदाजी
इंग्लंड संघाने आपल्या दुसऱ्या डावात अतिशय अवसानघातकी फलंदाजी केली. २४१ धावांची आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या डावातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर रॉरी बर्न्स झेलबाद झाला. पाठोपाठ इंग्लंडने नेहमीच्या तंत्राने आपले बळी गमावले. कर्णधार जो रूटने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. भारताकडून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ६ गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या:
अनुष्काने बर्प क्लोथसोबत फोटो अपलोड करताच हार्दिक पंड्याची मजेशीर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला
व्हिडिओ : सामना चालू असतांना भर मैदानात आली मांजर, मग नंतर घडले असे काही
दानशूर रिषभ पंत! उत्तराखंड दुर्घटनेतील बचावकार्यासाठी केला मदतीचा एक हात पुढे