भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने या दौऱ्यावरील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चर्चेत आला होता. ही चर्चा शमीच्या सामन्यातील कामगिरीमुळे नव्हे तर त्याच्या फाटक्या बूटांमुळे रंगली होती. तेव्हापासून का शमीने फाटके शूज घातले असावे? हा प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात घोंगावत आहे. आता ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यांनी चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे.
शेन वॉर्न यांनी सांगितले कारण
भारत-ऑस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्याचे समालोचक वॉर्न म्हणाले की, “गोलंदाजी करताना शमीला त्याचा डाव पाय जमिनीवर ठेवताना अधिक जागेची गरज असते. यामुळे तो व्यवस्थितरित्या त्याच्या हाताची गोलंदाज ऍक्शन पूर्ण करू शकतो. यादरम्यान आपल्या डाव्या पायाच्या अंगठव्यावर अधिक दबाव निर्माण झाल्यास त्याच्या गोलंदाजीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी शमीने मुद्दाम त्याच्या डाव्या पायाच्या बूटाच्या अंगठ्यावर छिद्र केले होते.”
Mohammad Shami has a hole in his left shoe so the toe can be free at the time of landing. pic.twitter.com/GPONwuIVy8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2020
फाटके बूट घालून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फसला
महत्त्वाचे म्हणजे, आपल्या गोलंदाजीच्या बळावर संघाला अधिकाधिक विकेट्स मिळवून देण्याच्या हेतूने शमीने फाटके बूट घातले होते. तरीही त्याचा हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला. कारण ऍडलेडमध्ये झालेल्या दिवसरात्र सामन्यात शमीला रिकाम्या हात माघारी परतावे लागले. त्याने पहिल्या डावात १७ षटके टाकत ४१ धावा दिल्या. दरम्यान एकही विकेट घेतली नाही. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाल्याने कर्णधार विराट कोहलीने त्याला ऑस्ट्रेलिच्या दुसऱ्या डावात गोलंदाजीची संधी दिली नाही.
शमी कसोटी मालिकेतून बाहेर
याव्यतिरिक्त सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा चेंडू हातावर लागल्याने शमी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करू शकला नव्हता. पुढे त्याची दुखापत गंभीर असल्याचे कळल्यामुळे त्याला कसोटी मालिकेतील उर्वरित ३ सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs AUS: दिवसरात्र कसोटी सामन्यात फाटके शूज घालून शमी करतोय गोलंदाजी, फोटो व्हायरल
भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
‘मोहम्मद शमी मालिकेबाहेर, ‘या’ गोलंदाजाला विनाविलंब ऑस्ट्रेलियाला पाठवा’, गावसकरांची आग्रही मागणी






