---Advertisement---

“मला विश्वास आहे की तो…”, सात वर्षांपूर्वीच दिवंगत वॉर्नने केलेली हेडबाबत भविष्यवाणी

On: सोमवार, नोव्हेंबर 20, 2023 4:08 PM
---Advertisement---

रविवार (दि. 19 नोव्हेंबर) हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड हा विजयाचा नायक ठरला. त्याने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपदापर्यंत पोहोचवले. मात्र, त्याच्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याने सात वर्षांपूर्वीच एक भविष्यवाणी करून ठेवली होती.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर त्यांचे पहिले तीन गडी स्वस्तात बाद झाले होते. मात्र, ट्रेविस हेड याने कोणताही दबाव न घेता भारतीय फलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 120 चेंडूंमध्ये 15 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. विजयासाठी केवळ दोन धावा आवश्यक असताना तो बाद झाला. या स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी करताना 6 सामन्यात 329 धावा केल्या. यात दोन शतके व एका अर्धशतकाचा समावेश होता. विशेष म्हणजे उपांत्य सामन्यात देखील तोच सामनावीर होता.

https://twitter.com/ShaneWarne/status/806074438370279424?t=Uj2p7VBLE_bU2F4bbcDfYQ&s=19

याच हेडबाबत शेन वॉर्न याने डिसेंबर 2016 मध्ये एक ट्विट करताना लिहिलेले,

‘मी क्रिकेटर म्हणून ट्रेविस हेडचा खूप मोठा चाहता आहे. मला विश्वास आहे की भविष्यात तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू असेल.’

या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.

(Shane Warne Viral Tweet About Travis Head After ODI World Cup Final)

हेही वाचा-
पराभवानंतर खचलेल्या भारताचा गंभीरने वाढवला कॉन्फिडन्स; ट्वीट करत म्हणाला, ‘मी आधीच म्हणालोय आपण…’
‘तुझं रडणं मनाला लागलं, पण तू…’, रोहितचा मान खाली घालून चालतानाचा व्हिडिओ पाहून हळहळला चाहता; पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---