ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू व दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे मागील वर्षी मार्च महिन्यात आकस्मित निधन झाले. क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये नाव घेतल्या जाणाऱ्या वॉर्नच्या निधनानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली. त्यानंतर आता जवळपास 11 महिन्यानंतर त्याच्या संपत्तीचे वाटपपत्र समोर आले आहे. त्याच्या मृत्युपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याने आपल्या या वाटपपत्रात आपली सर्वाधिक संपत्ती तीन मुलांच्या नावे केली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून वॉर्नला ओळखले जाते. मागील वर्षी 4 मे रोजी थायलंड येथे त्याचा आकस्मित मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास महिनाभराने सिडनी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या या अंत्यसंस्काराला तब्बल 50 हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आता त्याच्या पहिल्या वर्षश्राद्धाआधी त्याचे मृत्युपत्र समोर आले.
या मृत्युपत्रानुसार त्याची एकूण संपत्ती 20, 711, 013 अमेरिकन डॉलर इतकी दिसतेय. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत 120 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याने या मृत्युपत्रातील प्रत्येकी 31 टक्के वाटा आपली मुले जॅक्सन, समर व ब्रुक यांच्या नावे केला आहे. वॉर्न याने आपल्या सर्व गाड्या व बाईक्स मुलगा जॅक्सन याला दिल्या आहेत. याव्यतिरिक्त आपला भाऊ जेसन याला संपत्तीतील दोन टक्के वाटा त्याने देऊ केला आहे. तर, जेसन याची मुले सेबेस्टियन व टायला यांना देखील त्याने प्रत्येकी 2.5 टक्के संपत्ती देऊ केली.
विशेष म्हणजे या संपत्तीतील एक रुपयाही त्याने आपली पत्नी व तीन मुलांची आई सिमोन केहलन व प्रेयसी लिझ हर्ले यांना दिलेली नाही. सिमोन हिच्यासोबत त्याचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तर, लिझ याच्याशी कोणतेही आर्थिक तडजोड तो करणार नव्हता.
(Shane Warne Will Revealed Childrens Got 93% Property)





