पाकिस्तान क्रिकेट संघ आता नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पाकिस्ताननं 2017 मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून आयसीसी स्पर्धेमध्ये संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू शेन वॉटसनला मुख्य प्रशिक्षकपद देऊ शकते. वॉटसन सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरीही अप्रतिम राहिली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, वॉटसन संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. (pakistan head coach).
सूत्रांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि शेन वॉटसन यांच्यात नुकतीच चर्चा झाली. आगामी काळात त्याला पाकिस्तान संघाचं मुख्य प्रशिक्षक बनवलं जाऊ शकतं. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, वॉटसननं आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलेलं नाही. त्यामुळे कुठल्याही राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभवण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल.
शेन वॉटसन हा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं कांगारूंसाठी 59 कसोटी, 190 एकदिवसीय आणि 58 टी-२० सामने खेळले आहेत. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या वॉटसननं तब्बल 14 वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सेवा केली. 2016 मध्ये त्यानं निवृत्ती घेतली. वॉटसनच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम आहे. त्यानं एप्रिल 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध 185 धावा केल्या होत्या. तसेच 2012 च्या टी-20 विश्वचषकात तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील होता.
शेन वॉटसन बराच काळ आयपीएलचा भाग होता. तो 2008 मध्ये विजेतेपद विजेत्या राजस्थान संघाचा सदस्य होता. याशिवाय तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला आहे. चेन्नई संघासोबतची त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. 2018 च्या आयपीएल फायनलमध्ये त्यानं 57 चेंडूत 117 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. या सामन्यात दुखापत झाली असताना देखील वॉटसनची लढाऊ खेळी चाहत्यांच्या आजही लक्षात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: शुभमन नव्हे, हा तर ‘सुपरमॅन’! चित्त्यासारखं मागे धावत जाऊन घेतला बेन डकेटचा शानदार झेल
काय सांगता! क्रिकेटच्या देवाची विकेट Bigg Boss विजेत्या मुनवर फारुकीनं घेतली! पाहा Video
Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट