---Advertisement---

या क्रिकेट लीगमधून शेन वॉटसनने केली निवृत्तीची घोषणा

On: शुक्रवार, एप्रिल 26, 2019 1:03 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने शुक्रवारी(26 एप्रिल) बीग बॅश क्रिकेट लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वॉटसन 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाकडून खेळत होता. तसेच त्याने या संघाचे नेतृत्त्वही केले आहे.

पण बीग बॅश लीगमध्ये चार मोसम खेळल्यानंतर आता त्याने कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बीग बॅश लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी cricket.com.au. दिलेल्या वृत्ताप्रमाणे वॉटसन एनएसडब्ल्यू प्रीमियर लीगमध्ये सदरलँड डीसीसी संघाकडून आणि अन्य देशांच्या लीगमध्ये खेळत रहाणार आहे. 

वॉटसन बीग बॅश लीगमधून निवृत्ती घेतल्यानंतर म्हणाला, ‘मागील चार मोसमापासून सिडनी थंडर्समध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत.’

‘माझ्याबरोबर 2016 मधील विजयासह अनेक चांगल्या आठवणी कायम राहतील. पण या क्लबबरोबर माझा प्रवास मजेदार बनवल्याबद्दल विशेषत: निक कमिन्स, पॅडी अप्टनस, ली जर्मन आणि शेन बॉन्ड यांचे मला आभार मानायचे आहेत.’

‘माझ्या संघसहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. मी खूप चांगल्या खेळाडूंबरोबर खेळलो आणि मी मनापासून पुढील मोसमांसाठी सर्वांना शुभेच्छा देतो.’

या निवृत्तीमुळे वॉटसनचे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट कारकिर्दही संपली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 190 वनडे, 59कसोटी आणि 58 टी20 सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही विविध लीग स्पर्धेत खेळत राहण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच या लीग स्पर्धांमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने नुकतीच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 53 चेंडूत 96 धावांची खेळी केली होती. तसेच मागील बीग बॅश लीगच्या मोसमात त्याने 62 चेंडूत सिडनी थंडर्सकडून शतकी खेळी केली होती.

त्याचबरोबर  पाकिस्तान सुपर लीगच्या यावर्षीच्या मोसमातही त्याने चांगली कामगिरी केली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 12 डावात 430 धावा केल्या होत्या. तसेच बीग बॅश लीगच्या यावर्षीच्या मोसमातही त्याने उत्कृष्ट खेळताना सिडनी थंडर्सकडून 14 डावात 344 धावा केल्या होत्या.

वॉटसनच्या निवृत्तीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले, ‘शेन वॉटसन क्रिकेटमधील सर्वात लहान प्रकारातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. प्रतिभावान, कुशल आणि क्षमता असलेला वॉटसन एक चांगला फलंदाज आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने ब्रिस्बेन हिट विरुद्ध थंडर्सकडून खेळताना 62 चेंडूत शतक केले होते.’

वॉटसन हा सध्या जरी गोलंदाजी करत नसला तरी तो एक चांगला गोलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 291 विकेट्स घेतल्या आहेत.

याबद्दल रॉबर्ट्स म्हणाले, ‘दृढता ही त्याची सर्वोत्तम गुणवत्ता आहे. अनेक गंभीर दुखापतींनंतरही त्याने गोंदाजीतील त्याची गती कमी केली. तो एक चांगला स्विंग आणि सीम गोलंदाज झाला.’

‘अनेक दुखापतींनतरही त्याने खूप क्रिकेट खेळले. सर्व क्रिकेट प्रकारात मिळून ऑस्ट्रेलियाकडून 307 सामने त्याने खेळले. तसेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धेत मिळून त्याने 700 पेक्षाही अधिक सामने खेळले. त्याने 25,000 पेक्षाही अधिक धावा करताना 600 पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या.’

https://twitter.com/BBL/status/1121632167933571072

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९ संपण्यापूर्वीच हे परदेशी खेळाडू परतणार मायदेशी

Video: अविश्वसनीय! डिविलियर्सने एका हाताने मारला असा षटकार की चेंडू थेट गेला छतावर

सगळीकडे शोधलेला चेंडू, अखेर सापडला अंपायरच्याच खिशात, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment