इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ खास कामगिरी करताना दिसत नाहीये. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळून त्यातील 3 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याने यादरम्यान 25.86च्या सरासरीने 181 धावा केल्या आहेत. यात फक्त 1 अर्धशतकाचा समावेश आहे. अशात रोहित शर्मा हा मानसिकदृष्ट्या थकल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने म्हटले आहे.
चालू हंगामात रोहितची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. त्याचवेळी रोहितच्या एकूण परिस्थिती विषयी विश्लेषण केले. तो म्हणाला,
“रोहितला आपण त्याच्या सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये खेळताना पाहिले आहे. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून आयपीएलमध्ये लक्षात राहण्यासारखी कामगिरी त्याच्याकडून झालेली नाही.”
तो पुढे म्हणाला,
“तुम्हाला तुमची मानसिक ऊर्जा राखून ठेवणे गरजेचे असते. भारतीय खेळाडू वर्षभर क्रिकेट खेळत आहेत. रोहित देखील सातत्याने मैदानावर असतो. त्याच्यावर नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी देखील आहे. त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या थकलेला दिसतो. अशावेळी तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या वर्कलोड मॅनेजमेंट करायला हवे. काही सामन्यांमधून विश्रांती घेणे देखील गरजेचे आहे.”
रोहित या हंगामात सातत्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसतोय. तसेच मागील वर्षभरात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. आयपीएल समाप्त झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरावे लागणार आहे. त्यावेळी देखील रोहित शारीरिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असेल. भारत या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान स्वीकारेल.
(Shane Watson Said Rohit Sharma In Mental Fatigue Right Now He Needed Workload Management)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 1 – टाय ब्रेकर नंतर पालघर काझीरंगा रहिनोसने अतिरिक्त वेळेत मारली बाजी, पुण्याचे आव्हान संपुष्टात
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश