---Advertisement---

‘या’ एका गोष्टीमुळे चौथ्यांदा जिंकू शकतो आयपीएल विजेतेपद; सीएसकेच्या दिग्गज खेळाडूला आहे विश्वास

On: शुक्रवार, सप्टेंबर 11, 2020 6:58 PM
---Advertisement---

दुबई| कोव्हिड-19 ची 13 प्रकरणे उघडकीस आल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या आयपीएल२०२० च्या तयारीसाठी उशीर झाला. तरीही अनुभवी आणि सक्षम खेळाडूंच्या बळावर आयपीएल जिंकू शकतो, असे अनुभवी अष्टपैलू शेन वॉटसनचे मत आहे.

19 सप्टेंबरपासून स्पर्धा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी चेन्नई संघातील 13 सदस्यांना कोरोना साथीच्या आजाराची लागण झाली होती. यामध्ये दोन खेळाडूंचाही समावेश आहे. यामुळे अन्य संघांपेक्षा अधिक दिवस सीएसके संघाला क्वारंटाईन ठेवावे लागले आणि नंतर त्यांनी सराव सुरू केला.

शक्य तितक्या लवकर लय मिळविण्याची संधी

वॉटसनने नबिल हाश्मीच्या यूट्यूब कार्यक्रमामध्ये म्हटले आहे की, “एक अनुभवी संघ असल्याचा एक फायदा असतो. खेळाडूंना पहिल्या सामन्यापासूनच दबाव परिस्थितीत त्यांचे कौशल्य दाखवण्याची चांगली जाण असते.”

हाश्मी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये क्वेटा ग्लेडिएटर्सचा खेळाडू आहे. वॉटसन पीएसएलमध्ये याच संघाकडून खेळत आहे.

पुढे बोलताना वॉट्सन म्हणाला, “मला विश्वास आहे की आमच्याकडे जिंकण्याची चांगली संधी आहे, कारण आमच्याकडे खूप चांगले आणि अनुभवी खेळाडू आहेत. आम्हाला कमी चुका करताना शक्य तितक्या लवकर लय मिळविण्याची अधिक संधी आहे.”

चेन्नई सुपर किंग्जने नेहमीच दिली साथ

गेल्या हंगामातील चढ-उतारात चेन्नई संघाच्या व्यवस्थापनाने सहकार्य केल्याबद्दल वॉटसनने त्यांचे कौतुक केले.

कौतुक करताना तो म्हणाला, “2018 चा हंगाम माझ्यासाठी चांगला होता. हे फक्त अंतिम सामान्यांपुरतेच मर्यादित नाही (ज्यामध्ये त्याने शतक ठोकत सामना जिंकला). गेल्या वर्षी सीएसकेने मला पूर्ण पाठिंबा दर्शविला. मला खात्री आहे की मी लवकरच एक चांगली खेळी खेळू शकेन. ते मला साथ देत राहिले आहे. केवळ जागतिक दर्जाचे नेतृत्वच या मार्गाने विश्वास टिकवून ठेवते.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---