येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाचा विजेता संघ कोणता असेल यावरून अनेक दिग्गज आपापले अंदाज बांधत आहेत. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन याने आशिया चषकाच्याविजेत्याबाबत भविष्यवाणी केली आहे. भारत हा मजबूत संघ असल्याने तो जिंकेल असा अंदाज त्याने वर्तवला आहे.
“भारत जिंकेल असा माझा अंदाज आहे. तो खूप मजबूत संघ आहेत आणि त्यानुसार परिस्थिती पाहता ते सहज परिस्थितीशी जुळवून घेतात असे म्हणता येईल. पहिला सामना खूप खास असणार आहे कारण पाकिस्तानला आता विश्वास आहे की ते या भारतीय संघाला पराभूत करू शकतात. माझ्या मते हा सामना जो जिंकेल तो आशिया कप जिंकणार आहे. भारत ही स्पर्धा जिंकेल असे मला वाटते.” असं म्हणत वॉटसनने टीम इंडियाला समर्थन दिले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माजी पाकिस्तानी कर्णधाराची मनापासून इच्छा, PAKविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये असावा ‘हा’ मॅच विनर
‘दिलसे बुरा लगता है!’ सारा तेंडूलकर अन् शुबमन गिलचं ब्रेकअप?