ज्युनिअर हॉकी विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. भारताच्या तरुण खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला १-० फरकाने हरवले. हा एकमेव गोल भारताकडून शारदानंद तिवारी ह्याने केला. वडील हा सामना पाहू नाही शकले, पण त्यांना आज त्यांच्या मुलाचा खूप अभिमान वाटत आहे.
शारदानंदने विश्वचषकात आतापर्यंत ४ गोल मारले आहेत, जे भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासात खूप महत्त्वाचे आहेत. त्याला स्वतःवर खूप विश्वास आहे त्यामुळेच तो आतापर्यंत कठोर मेहनत करून यशस्वी होऊ शकला. तो फक्त संघात खेळलाच नाहीतर महत्त्वपूर्ण योगदान देखील देऊ शकला. शारदानंदने लहान वयात हॉकीसाठी खूप कठोर मेहनत केली, ज्याचा साधा विचार देखील मुलं त्या वयात करू शकत नाही.
हॉकीसाठी शाळा सोडून केली नोकरी
शारदानंदचे वडील गंगाप्रसाद इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, ते आपल्या पत्नी आणि ४ मुलांसोबत लखनऊला आले. केडी जाधव स्टेडियम घरापासून जवळ होते. शारदानंदने तेथे हॉकीच्या खेळाडूंना बघताच त्याने ठरवले की तो देखील हॉकी खेळणार. परंतु, त्याचे वडील गोष्टीशी सहमत नव्हते. तरी शारदानंद आपल्या निर्णयावर ठाम होता.
तो तीन महिने शाळा सोडून किरणाच्या दुकानावर काम करत होता. तिथे त्याला महिन्याला ३०० रुपये मिळत होते. जेव्हा हे याबद्दल त्याच्या वडिलांना कळालं, तेव्हा त्यांना खूप राग आला, पण ते म्हणाले आता पैसे कमी पडणार नाही. तेव्हा फक्त १५०० रुपये पगारात कुटुंबाचं भागात नव्हता. त्याला किटच नाही, तर जेवण देखील नीट मिळायचे नाही. तो फक्त चहा पिऊन सरावासाठी जायचा.
कुटुंब आणि वडिलांना शारदानंदवर अभिमान
शारदानंदला पहिल्यांदा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या लखनऊ केंद्राचे प्रशिक्षक नीलम सिद्दीकी ह्यांनी बघितलं आणि त्याला कॅम्पला घेऊन गेले. परंतु,, त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्याने तिथे देखील दुसऱ्यांची हॉकी स्टिक आणि स्पोर्ट्स शूज घातले. तो नेहमी त्याची हॉकी स्टिक दुरुस्त करायचा, कारण ती कमकुवत असल्याने सारखी तुटायची.
आज एवढी कठोर मेहनत करू शारदानंद विश्वचषकामध्ये खेळत आहे. उपांत्यपूर्व फेरीत शारदानंदने मारलेला गोल त्याचे वडील नाही बघू शकले, कारण तेव्हा ते ड्युटीवर होते. ते डीएममध्ये चालक म्हणून काम करत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला शारदानंदवर अभिमान वाटत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ज्यूनियर हॉकी विश्वचषक: पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का
तिसरी एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धा: महाराष्ट्राच्या मुली ठरल्या सरस