आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. सराव सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु, रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होणार आहे. कारण अंतिम ४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला पुढील सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. ज्यामुळे न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हेनमध्ये महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध रंगणार आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघातील खेळाडू सराव करत असतानाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्व खेळाडू ४-४ खेळाडूंच्या ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आर अश्विन, विराट कोहली, वरूण चक्रवर्ती आणि शार्दुल ठाकूर एकत्र सराव करताना दिसून येत आहेत. शार्दुल ठाकूर ज्याप्रकारे मैदानावर घाम गाळतोय ते पाहून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी दिली जाऊ शकते. तर आणखी एका फोटोमध्ये ईशान किशन देखील सराव करताना दिसून येत आहे.
शार्दुल ठाकूर सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यामधे शार्दुल ठाकूरने देखील मोलाचे योगदान दिले होते.
We are back!
A fun drill to start our session. #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/lCmla6hcfT
— BCCI (@BCCI) October 27, 2021
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. तसेच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे हार्दिक पंड्या फिट होऊन मैदानावर परतला असून तो गोलंदाजी करताना दिसून आला आहे. परंतु तो जर पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला तर त्याच्या ऐवजी ईशान किशनला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीने केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जडेजा झाला निराश
हॅरिस रौफमुळे का चर्चेत आला टेप बॉल? काय असतो ‘हा’ प्रकार? जाणून घ्या सविस्तर