अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (१८ मार्च) चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत भारतीय संघाने २-२ ने बरोबरी केली.
इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात २३ धावांची गरज असताना कर्णधार रोहित शर्माने चेंडू शार्दुल ठाकूरच्या हातात दिला. या निर्णायक षटकात तणावात आलेल्या शार्दुलने महागडी गोलंदाजी केली. मात्र शेवटच्या क्षणाला विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. सामना झाल्यानंतर शार्दुलने शेवटच्या षटकात तणाव का वाढला होता? याचे स्पष्टीकरण दिले आहे.
भारताच्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड २० व्या षटकापर्यंत ७ बाद १६३ धावा अशा स्थितीत होता. अशात शार्दुलच्या हाती २० वे आणि निर्णायक षटक देण्याचा धाडसी निर्णय रोहितने घेतला. शार्दुलने या षटकात २ वाइड, १ षटकार आणि चौकार दिला. त्यामुळे विजयाच्या उंबरठ्यावर उभे असताना अवघ्या काही धावांनी भारताला सामना गमवावा लागेल, असे सर्वांना वाटू लागले. परंतु शार्दुलने १९.५ चेंडूवर ख्रिस जॉर्डनला बाद करत ८ विकेट्सने सामना जिंकवून दिला.
दवांमुळे गोलंदाजीत त्रास झाला
सामना झाल्यानंतर शार्दुल ठाकूर म्हणाला, “मागील तीन सामन्यांपेक्षा या सामन्यात खूप जास्तच दव होते. यामुळे शेवटच्या षटकात चेंडू स्विंग करणे खूप कठीण जात होते. अखेरच्या षटकात निर्धाव चेंडू टाकणे गरजेचे होते. परंतु असे होत नव्हते. जेव्हा मी हळुवार बाऊंसर टाकला, त्या चेंडूवर फलंदाजाने षटकार मारला. जर आपण यष्टीवर हळुवार गतीने बाऊंसर चेंडू टाकतो; तर तो मारणे सहज शक्य असते. त्यामुळे मला चेंडू पावर झोनपासून थोडा दूर ठेवायचा होता. मी हेच केले परंतु यावर देखील धावा आल्या.”
रोहितने दिलेला मोलाचा सल्ला
तसेच तो पुढे म्हणाला, ” मैदानावरील दवांमुळे गोलंदाजी करण्यात त्रास होत होता. तरीदेखील आम्ही चेंडू पुसून पुन्हा गोलंदाजी केली. यामुळे चेंडू व्यवस्थित जात होते. मी या गोष्टीचा आनंद घेतला. मी अशा वेळेस गोलंदाजी करत होतो, ज्यावेळेस फलंदाज चांगले होते. शेवटच्या षटकात हार्दिक माझ्याकडे योजना घेऊन आला होता. परंतु रोहितची अपेक्षा होती की, मी माझ्या हिशोबाने गोलंदाजी करावी. त्याने मला म्हटले, मैदानाचा सर्वात छोटा भाग पाहून घे आणि त्याच हिशोबाने गोलंदाजी कर.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे नक्की काय रे भावा? ज्यामुळे सूर्यकुमारच्या वादळी खेळीला लागला अनपेक्षित ब्रेक!
रोहितच्या कॅप्टन्सीची कमाल! शेवटच्या ४ षटकात घेतले धाडसी निर्णय अन् ‘असा’ फिरवला सामना