---Advertisement---

विकेट घेतल्यानंतर शार्दुल ठाकूरचे जोरदार सेलिब्रेशन, हेन्रीक्सला दिली खुन्नस, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, डिसेंबर 3, 2020 8:32 AM
---Advertisement---

कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. पण सामन्यानंतर भारताच्या विजयाबरोबर अनेक गोष्टींचीही चर्चा झाली. यात शार्दुल ठाकूरच्या आक्रमकतेचीही चर्चा झाली. विकेट घेतल्यानंतर त्याने दाखवलेल्या आक्रमकतेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शार्दुलने या सामन्यात गोलंदाजी करताना १० षटकात ५१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. या ३ विकेट्सपैकी एक विकेट मोझेस हेन्रीक्स या ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूची होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या २ विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार ऍरॉन फिंचला भक्कम साथ देताना अर्धशतकी भागीदारी रचली होती. ही भागीदारी रंगत असतानाच २३ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी विराट कोहलीने शार्दुलकडे चेंडू सोपवला.

शार्दुलनेही कर्णधाराला नाराज न करता या षटकाचा दुसरा चेंडू आखुड टप्प्याचा टाकत हेन्रीक्सला झेलबाद केले. हेन्रीक्सने मिड-विकेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू शिखर धवनने अचूक टिपला.

यानंतर मात्र विकेट घेतल्याचे शार्दुलने जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी तो हेन्रीक्सला खुन्नस देतानाही दिसला. विराट देखील शार्दुलने घेतलेल्या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन करताना दिसला. शार्दुलच्या या विकेटच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सामन्यानंतर सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला. त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियाही आल्या.

https://twitter.com/BaliKanav/status/1334067956498763777

https://twitter.com/ShreyasIyer41FC/status/1334144992630116352

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ३०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सर्वबाद २८९ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अरे व्वा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेला मुकूनही रोहितने केला ‘हा’ खास विक्रम

“आदर हवा असेल तर तो करायलाही शिका”, युवा गोलंदाजाचे आफ्रिदीला जोरदार प्रत्युत्तर

गावभर चर्चा! सिडनीचं मैदान गाजवणारा ‘तो’ भारतीय तरूण अन् त्याची ‘ती’ ऑस्ट्रेलियन मैत्रिण; पाहा ‘लव बर्ड्स’ची खास मुलाखत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---