---Advertisement---

भारताची डोकेदुखी वाढली; दुसऱ्या कसोटीतून अष्टपैलू माघार घेण्याची शक्यात, सराव करताना दुखापत

On: शनिवार, डिसेंबर 30, 2023 7:22 PM
Team India
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी 3 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावालाही सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघ या पराभवाचा बदला घेण्यासाठी खेळेल. असे असले तरी, केपटाऊन कसोटीआधी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेलाडूंनी सरावाला सुरुवात केली. पण सराव सत्रादरम्यानच भारताचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार शार्दुलच्या खांद्याला दुखापत झाली असून दो दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेऊ शकतो. नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाल्याचे समजते. खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर शार्दुलला प्रचंड वेदना होत होत्या, असेही माध्यमांमधून समोर येत आहे. स्कॅननंतर शार्दुलच्या फिटनेसबाबत पक्की माहिती समोर येऊ शकते.

दरम्यान, शार्दुलची ही दुखापत गंभीर असेल, तर त्याच्या जागी पुढच्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा खेळू शकतो. जडेजाने पाठिच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली होती. दुसऱ्या कसोटीआधी जर जडेजा फिट असेल, तर नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळेल.

उभय संघांतील ही कसोटी मालिका सुरू होण्याआधी मोहम्मद शमी, ऋतुराज गायकवड आणि ईशान किशन यांना या मालिकेसाठी निवडले गेले होते. शमी आणि ऋतुराजने फिटनेसच्या कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली, ईशान किशनने मानसिक थकवा आल्याचे कारण देत विश्रांतीसाठी वेळ मागितला. ईशान किशनच्या जागी केएस भरत याला संघात घेतले गेले, तर ऋतुराजचा बदली खेळाडू म्हणून अभिमन्यु ईश्वरन याला संधी दिली गेली. (Shardul Thakur injured ahead of second Test against South Africa)

यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन – 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

महत्वाच्या बातम्या – 
श्रीलंकेला मिळाले दोन नवे कर्णधार, झिम्बाब्वेविरूद्द वनडे आणि टी20 मालिकेत करणार नेतृत्व
धोनीच्या डोळ्यात पाणी पाहिलय? सीएसकेने शेअर केला 9 वर्षांपूर्वीचा फोटो, कारणही वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---