भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर जखमी प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात स्थान घेणार आहे. 26 वर्षीय प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या चार दिवसीय कसोटीतून बाहेर पडला. शार्दुल ठाकूर सध्या थायलंडमध्ये सुट्टीवर असून त्याला तातडीने परतण्याचा संदेश देण्यात आला आहे.
क्रिकबझमधील वृत्तानुसार, भारत ‘अ’ संघात स्थान दिल्यानंतर ठाकूरला दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागीय संघातून वगळण्यात आले होते, ज्यामध्ये त्याचे नाव आधी होते. ठाकूरच्या जागी सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाचा झोनल संघात समावेश करण्यात आला आहे. पश्चिम विभागीय निवडकर्त्यांनी रविवारी राजकोटमधील 24 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाजाची अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात निवड केली जी 8 ते 25 सप्टेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये होणार्या आंतर-झोनल स्पर्धेत भाग घेणार आहे.
30 वर्षीय शार्दुल ठाकूर लवकरच प्रियांक पांचालच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघात कर्नाटकात सामील होणार आहे. रविवारी भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला. या मालिकेतील आणखी दोन सामने निर्धारित आहेत, जे अनुक्रमे 8 आणि 15 सप्टेंबर रोजी हुबली आणि बेंगळुरू येथे सुरू होणार आहेत.
भारत ‘अ’ संघ:
प्रियांक पांचाळ (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, केएस भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मुकेश कुमार यश दयाल आणि अर्जन नागवासवाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार
‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतः रैनाने केला होता खुलासा