सोशल मीडियावर अनेक क्रिकेटपटू आपल्या लहानपणीचे फोटो पोस्ट करतात. याच दरम्यान भारतीय संघाच्या एका वेगवान गोलंदाजाने आपल्या शाळेच्या दिवसातील एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत खेळाडूसोबत त्याच्या शाळेतील मित्र ही आहेत. हा फोटो शेअर करत या खेळाडूने त्याच्या शाळेच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या बालपणीच्या फोटोमध्ये असलेला खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर आहे. त्याने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो शेअर करत चाहत्यांना त्यात तो नेमका कुठे आहे, हे ओळखायला देखील सांगितले आहे. चाहत्यांनी देखील त्याला प्रतिसाद देत या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CQMGeW6jQXL/?utm_source=ig_embed&ig_rid=efd05d55-bf72-4681-bf9d-cbab2727b8ef
शार्दुलने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करत भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. परंतु न्यूझीलंडच्या विरुद्ध 18 जून रोजी होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी शार्दुल ठाकूरची संघामध्ये निवड झाली नाही आहे.
शार्दुल उत्कृष्ट गोलंदाजी तर करतोच परंतु तो एक उत्तम फलंदाजही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघातील अव्वल स्थानावरील क्रिकेटपटूंना दुखापत झाली होते. ज्यामुळे युवा क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळाली. त्याने संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी मदत केली. या वर्षी होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी शार्दुल ठाकुर सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. परंतु त्याला अंतिम सामन्याच्या संघांमध्ये स्थान मिळालेले नाही.
शार्दुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
शार्दुल ठाकुरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतीय संघाकडून 2 कसोटी सामने, 15 एकदिवसीय सामने आणि 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात शार्दुलने कसोटी सामन्यांमध्ये 7, एकदिवसीय सामन्यांमध्ये 22 आणि टी20 सामन्यांमध्ये 31 बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ