---Advertisement---

भर सामन्यात शार्दुलचे अश्लील कृत्य, इंग्लिश फलंदाजांना दाखवलं मधले बोट; चाहत्यांनी केलं ट्रोल

On: मंगळवार, मार्च 30, 2021 1:11 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गहुंजे स्टेडियम, पुणे येथे झालेला तिसरा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. या धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडला अवघ्या ७ धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी २-१ ने वनडे मालिकाही खिशात घातली. भारताच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही योगदान दिले. दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

इंग्लंड संघाचा डाव चालू असताना शार्दुल गोलंदाजी करतेवेळी विरोधी संघाच्या फलंदाजांना हाताचे मधले बोट दाखवत असल्याची ही चर्चा आहे. हातात चेंडू पकडून मधले बोट वर केले असतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी असे कयास लावण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर यावरुन शार्दुलवर टिकाही केली आहे.

https://twitter.com/paarrthhh/status/1376194579758637057?s=20

https://twitter.com/viratkohliFab/status/1376183966605090818?s=20

खरे तर, वेगवान गोलंदाज शार्दुल नकल बॉल टाकत असतानाचा हा फोटो आहे. यावेळी तो मधले बोट वर करतो आणि बाजूच्या दोन बोटांनी चेंडू पकडतो. परंतु अनेकांनी त्याच्या या गोलंदाजी शैलीचा वेगळा अर्थ घेत त्याला ट्रोल केले आहे.

तिसऱ्या वनडे विजयात शार्दुलचा मोलाचा वाटा
तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात शार्दुलने फलंदाजी करताना २१ चेंडूत ३० धावांची छोटेखानी खेळी केली होती. दरम्यान त्याने ३ षटकार आणि १ चौकारही मारला होता. याबरोबरच गोलंदाजी करताना त्याने संघाला महत्वाच्या विकेट्सही मिळवून दिल्या होत्या. डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन आणि जोस बटलर ही इंग्लंडची मधली त्याने तंबूत धाडली होती. तर अखेरच्या क्षणी आदिल रशीदची महत्त्वाची विकेट घेत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

अरेच्च्या! काँग्रेस प्रवक्त्याचा भारतीय दिग्गजासोबत विमान प्रवास, शेजारी बसूनही नाही ओळखलं

‘या’ बॅकअप फिरकीपटूंच्या मदतीने टीम इंडिया पटकावणार टी२० विश्वचषक, अश्विनचाही समावेश

यालाच आम्ही सिंहाची भावना म्हणतो! ‘असे’ केले सीएसकेने सॅम करनच्या अविस्मरणीय खेळीचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---