---Advertisement---

शार्दुलने विमानतळ प्रशासनाशी घेतला पंगा! भारतीय दिग्गजाला करावी लागली मध्यस्थ

On: बुधवार, ऑक्टोबर 12, 2022 1:42 PM
---Advertisement---

विमानतळावर प्रवाशांचे सामान गहाळ होणे अथवा उशिराने येणे अगदी सामान्य गोष्ट आहे. सामान्य प्रवाशांना हा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. आता भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला देखील हा अनुभव आला आहे. त्याने आपल्या सोबत घडलेल्या घटनेबाबत ट्वीट करत माहिती दिली. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग त्याच्या मदतीला धावला.

शार्दुल ठाकूर नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. मालिकेतील तिसरा सामना दिल्ली येथे संपल्यानंतर तो बुधवारी (12 ऑक्टोबर) मुंबई येथे पोहोचला. मात्र, विमानातून उतरल्यानंतर टर्मिनस 2 वर बराच वेळ त्याचे किट बॅग आणि इतर सामान त्याला मिळाले नाही. आपल्याला होत असलेल्या गैरसोयीबाबत त्याने ट्विट केले. त्याने लिहिले,

 

‘एअर इंडियाचे कोणी मला माझे सामान मिळवून देण्यासाठी लगेज बेल्टपाशी येईल का? हे पहिल्यांदाच होत नाही जेव्हा माझी किट बॅग उशिराने आलीये. तसेच येथे कोणीही मदतीसाठी उपलब्ध नसते.’

शार्दुलचे हे ट्विट वाचल्यानंतर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने तातडीने ट्विट केले. त्याने लिहिले,

 

‘माय डियर, तुम्हाला तुमचे सामान आणि मदत लवकरच मिळेल. गैरसोयीबद्दल क्षमा असावी.’ तसेच हरभजनने कंसात माजी एअर इंडिया कर्मचारी असे देखील लिहिले.‌ हरभजन सुरवातीची काही वर्ष एअर इंडियासाठी काम केले होते. या संपूर्ण प्रकारानंतर शार्दुलने थोड्या वेळाने ट्विट करत आपले सामान व किट बॅग मिळाल्याची माहिती दिली.

शार्दुल ठाकूर याची नुकतीच टी20 विश्वचषकासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. तो लवकरच ऑस्ट्रेलियाला प्रयाण करेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंड्याला टक्कर द्यायला आला ‘हा’ ऑलराऊंडर! टी20 सामन्यात तुफानी फिफ्टी आणि घेतल्या 6 विकेट्स
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---