मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू श्श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने पात्रता फेरीत सुरेख खेळाचे प्रदर्शन करत या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे.
२२ वर्षीय हैद्राबादच्या श्रीवल्लीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. सध्याची एकेरी व दुहेरी राष्ट्रीय विजेती श्रीवल्लीला माजी जागतिक अग्रमानांकित खेळाडू मारिया शारापोवा हिच्या मैदानावरील आकर्षक पोशाखांनी प्रभावित केले आहे. यावेळी श्रीवल्ली म्हणाली की, मी नेहमी मारिया शारापोवाची छायाचित्रे पाहत आली आहे. किंबहुना तिच्यासारखे सुंदर कपडे घालण्याच्या मोहापोटीच मी वयाच्या केवळ ११व्या वर्षी टेनिस खेळण्यासाठी प्रवृत्त झाले. टेनिस खेळत असल्यामुळे मला तिच्यासारखे आकर्षक कपडे घालता आले. त्या अर्थाने माझा टेनिस मधील सहभाग हा एक योगायोग होता.
आई बास्केटबॉल खेळाडू आणि वडील क्रिकेट व कराटे पटू असल्यामुळे क्रिडा क्षेत्राची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीवल्लीने टेनिसला प्रारंभ केल्यानंतर खेळाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. माझ्यासाठी हा सारा प्रवास खाचखळग्यांचा होता असे सांगून श्रीवली म्हणाली की, टेनिस मला खरोखरीच खूप आवडते याचे दुसरे कारण म्हणजे घरात बसून सारखे अभ्यास करण्याची सक्ती केली जात नाही.
डब्लुटीए मुंबई ओपन या स्पर्धेतील माझे हे पदार्पणच असल्यामुळे मी त्यासाठी कोणतेही लक्ष ठेवलेली नाही, असे सांगून श्रीवल्ली म्हणाली, मी खेळाचा पुर्ण आनंद घेऊ इच्छिते आणि माझी प्रत्येक प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा सरस मानांकित असणार आहे. त्यामुळे माझी सर्वोत्तम कामगिरी करणे इतकेच माझे ध्येय असणार आहे.
तसेच, या स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश केल्यामुळे मी खूप रोमांचित झाले असून कोणतेही दडपण न घेता अन्य स्पर्धांप्रमाणेच या स्पर्धेत खेळणार असणार असल्याचे तिने सांगितले. मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत श्रीवल्ली समोर दुसऱ्या मानांकित नाओ हिबिनोचे आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई ओपनच्या पहिल्या फेरीत भारताच्या अंकिता रैना, सहजा यमलापल्ली यांच्यापुढे मानांकित खेळाडूंचे आव्हान
मुंबई ओपनमध्ये भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीचा मुख्य फेरीत प्रवेश