---Advertisement---

IPL 2024 : घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा धक्कादायक पराभव, अखेरच्या षटकात पंजाब किंग्जचा सनसनाटी विजय । GT vs PBKS

pbks-win-against-gt
---Advertisement---

अहमदाबादेतील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (दि. 4) झालेला आयपीएलचा 17वा सामना पंजाब किंग्ज संघाने 1 चेंडू राखत आणि 3 विकेट राखत जिंकला. अखेरच्या षटकात पंजाब किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर धक्कादायक पराभव केला. पंजाबच्या सर्वच खेळाडूंनी दिलेली झुंज महत्वाची ठरली. तर शशांक सिंहने एकेबाजूने किल्ला लढवल्याने पंजाब किंग्ज संघाचा विजय सुकर झाला. ( Shashank Singh and Ashutosh Sharma have scripted thumping win for PBKS against GT )

पंजाब किंग्जकडून शशांक सिंह याने 29 चेंडूत 61 धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्यासोबतच जॉनी बेअरस्टो (22), प्रभसिमरन सिंह (35), आशुतोष शर्मा (31) यांनी देखील पंजाबच्या विजयात बहुमोल योगदान दिले. तसेच गोलंदाजीत गुजरात टायटन्स संघाचा धावफलक 200 च्या आत रोखण्यात पंजाबच्या गोलंदाजांनी प्रयत्न केले. पंजाबकडून रबाडाने सर्वाधिक 2 तर हरप्रित ब्रार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एकएक विकेट घेतल्या.

दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आणि लोकल बॉय शुभमन गिल याने 48 चेंडूत 89 धावांची खेळी केली, त्याच्या जोरावर आणि साई सुदर्शन (33) व केन विलियम्सन (26) तेवतिया (23) यांच्या धावांच्या मदतीने गुजरातने 199 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतू गुजरातच्या गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. गुजरातच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांना एक एक विकेट्स मिळाल्या परंतू, त्या बदल्यात त्यांनी दिलेल्या धावा अधिक होत्या. त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

अधिक वाचा –
– IPL 2024 GT vs PBKS : टॉस जिंकून पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात घातक खेळाडूंची एन्ट्री, पाहा प्लेइंग इलेव्हन

– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ
– सुपर फॉर्ममध्ये असलेल्या CSK संघाला धक्का! प्रमुख गोलंदाज तातडीने मायदेशी परतला, संपूर्ण स्पर्धेला मुकणार? । IPL 2024

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---