---Advertisement---

सुपर फॉर्ममध्ये असलेल्या CSK संघाला धक्का! प्रमुख गोलंदाज तातडीने मायदेशी परतला, संपूर्ण स्पर्धेला मुकणार? । IPL 2024

CSK
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीएसके संघाचा प्रमुख गोलंदाज तातडीने त्याच्या मायदेशी परतला आहे. तो पुढील सामना तर खेळू शकणार नाही, परंतू उर्वरित स्पर्धेत खेळू शकतो की नाही, याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. सीएसकेचा हा प्रमुख गोलंदाज म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून सीएसकेच्या यंदाच्या हंगामातील विजय साकारणारा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हाच आहे. ( big blow for csk star fast bowler mustafizur rahman will most likely miss more than one match in ipl 2024 due to visa )

चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या सामन्याआधी हा मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत पर्पल कॅप होल्डर असलेला मुस्तफिजूर रहमान पुढच्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. तसेच मुस्तफिजून आयपीएलच्या उर्वरित हंगामातूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणतीही दुखापत नसताना तो काही महत्वाच्या कारणाने मायदेशी अर्थात बांगलादेशला रवाना झाला आहे. मुस्तफिजूर रहमान घरी गेला असल्याने तो 5 एप्रिल रोजी सीएसके आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी नक्कीच उपलब्ध नसणार आहे.

एका माध्यम संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुस्तफिजूर रहमान हा व्हिसा संबंधी अडचणीमुळे बांगलादेशी परतला आहे. युएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी त्याला व्हिसाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात काही अडचणी असून त्यासाठीच तो बांगलादेशला परतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मुस्तफिजूर त्याच्या अमेरिकन व्हिसासाठी बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बांगलादेशला गेला असल्याचे सांगितले जात आहे. बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही तो भारतात येऊ शकणार नाही. कारण पोसपोर्ट परत देण्याआधी एक वेटिंग पीरियड पूर्ण करावा लागेल. त्यावेळी त्याला बांगलादेशमध्येच रहावे लागेल. त्यामुळे चेन्नईकडून तो आता पुन्हा कधी खेळेल, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

अधिक वाचा –
– कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक 
– कोण आहे ऋषभ पंतची रूमर्ड गर्लफ्रेंड? अनेक वर्षांपासून आहेत दोघं रिलेशनशिपमध्ये
– टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---