---Advertisement---

टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत

---Advertisement---

गुजरात टायटन्सनं आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. संघ 3 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

गुजरातनं 2022 मध्ये आयपीएल पदार्पण केलं होतं. हा त्यांचा आयपीएलमधील केवळ तिसरा हंगाम आहे. मात्र, गेल्या दोन हंगामात चमकदार कामगिरी करून त्यांनी एक मजबूत चाहतावर्ग निर्माण केला आहे. गुजरात पदार्पणाच्या हंगामात चॅम्पियन ठरला होता, तर गेल्या हंगामात ते अंतिम फेरीपर्यंत पोहचले होते. मात्र विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सीएसकेकडून पराभव झाला होता. या कामगिरीमुळे गुजरात टायटन्स चाहत्यांची पसंतीची टीम बनली आहे.

या प्रेमाचा जिवंत पुरावा नुकताच एका छोट्या चाहत्यानं दिला. या चाहत्यानं गुजरातला चीअर करताना चक्क स्टेडियममध्ये आपला टी-शर्ट काढला आणि नाचायला सुरुवात केली. नाचता-नाचता हा मुलगा हातातील टी-शर्ट फेकून देतो. काही सेकंदानंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात येते आणि तो खाली जाऊन फेकलेला टी-शर्ट उचलतो. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

स्टेडियममध्ये लहान चाहत्याला असं नाचताना पाहून लोकांना एक अतिशय प्रसिद्ध मीम आठवला. हा मीम फुटबॉल सामन्यादरम्यान बनला होता. येथे एक लहान मुलगा असाच उत्साहानं त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसला होता. या मुलानं गुजरातच्या चाहत्यासारखा टी-शर्ट जरी काढत नसला, तरी तो टी-शर्ट उचलून नाचताना दिसतो. खरंच लहान मुलांमध्येही एक वेगळाच उत्साह असतो! हे दोन्ही व्हिडिओ इथे पहा…

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं आयपीएल 2024 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 धावांनी जिंकला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांना 63 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर तिसऱ्या सामन्यात गुजरातनं सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या-

सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

“मला मयंक यादवचा सामना करायचाय, त्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला यावं”, स्टीव स्मिथचं खुलं आव्हान

लखनऊला बसला मोठा धक्का! 6.4 कोटी रुपयांचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---