आयपीएल 2024 च्या 16व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स समोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. विशाखापट्टणम येथील मैदानावर हा सामना खेळला जातोय. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – आम्ही प्रथम फलंदाजी करू. शेवटच्या गेमच्या तुलनेत विकेटमध्ये कोणताही मोठा बदल नाही. सुनील नरेन पहिल्या 6 षटकांमध्ये गोलंदाजांवर आक्रमण करतोय. त्याची भूमिका अगदी स्पष्ट आहे. बाकीच्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे माहित आहे. आमच्या संघात एक बदल – आंग्रिश रघुवंशी प्लेइंग 11 मध्ये येतोय
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत – आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. वेगवान गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असून त्यांनी जारी ठेवावं अशी इच्छा आहे. आम्ही नेट्समध्ये भरपूर मेहनत घेत आहोत. संघात एक बदल – मुकेश जखमी झाला, त्याची जागा सुमितनं घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्किया, ईशांत शर्मा, खलील अहमद
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीनं सुरुवातीच्या दोन पराभवानंतर शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर 20 धावांनी विजय मिळवला. अशा स्थितीत टीमचं मनोबल उंचावलेलं असेल. दिल्लीला पुन्हा एकदा पंत, डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या तिघांनीही सीएसकेविरुद्ध चागली फलंदाजी केली होती. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 20 धावांनी पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 7 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीविरुद्ध सलामीवीर फिलिप सॉल्ट, सुनील नरेन आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफानी फलंदाजी केली होती. आज केकेआरची नजर विजयाच्या हॅट्ट्रिककडे असेल.
दोन्ही संघांच्या हेड टू हेडबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली आणि कोलकाता यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली आहे. दोन्ही संघ एकूण 32 वेळा एकमेकांसमोर आले, ज्यापैकी दिल्लीनं 15 आणि केकेआरनं 16 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला. मात्र दिल्लीनं कोलकाताविरुद्धचे मागील तीन सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत
सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क