क्रिकेटटॉप बातम्या

सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

कल्पना करा, 7 वर्षांचा मुलगा एकापाठोपाठ एक हेलिकॉप्टर शॉट मारतोय. तो पुढ्यात आलेला प्रत्येक चेंडू आकाशात टोलावतोय. तुम्हाला वाटत असेल की, आम्ही महेंद्रसिंह धोनीच्या बालपणाबद्दल बोलत आहोत, मात्र असं अजिबात नाही.

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा एमएस धोनीप्रमाणे एकामागून एक षटकार मारताना दिसतोय. मात्र हा व्हिडिओ धोनीच्या बालपणीचा नाही! या मुलाचं नाव आहे तनय. वयाच्या 7 व्या वर्षापासून तनय एकामागून एक ज्याप्रमाणे क्रिकेट शॉट्स खेळतोय, हे पाहून संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनं तनयच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोनं शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, हा व्हिडिओ सुरतच्या जिनेश जैन यांनी पाठवला आहे. व्हिडिओच्या खाली, ‘धोनी सारखा सात वर्षांचा छोटा मुलगा’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या मुलाच्या या बॅटिंगचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रभावित झाले आहेत. युजर्स  सातत्यानं कमेंट करून मुलाची तुलना महेंद्रसिंह धोनीशी करतायेत. आता बघूया हा व्हिडिओ धोनीचं लक्ष वेधून घेतो की नाही!

 

काही दिवसांपूर्वी ‘फीमेल क्रिकेट’च्या सोशल मीडिया हॅन्डलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी एकामागून एक सुंदर फटके मारताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ही तीन वर्षांची मुलगी खूप सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळते. पुढच्याच चेंडूवर ती कव्हर्सला शॉट मारते. व्हिडिओमध्ये मुलगी विविध शॉट्स खेळताना दिसत आहे.

ही मुलगी इतकी लहान आहे की तिनं पॅड म्हणून चक्क एल्बो गार्डचा वापर केला आहे. परंतु तिचे फटके पाहता ती अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत असल्याचं भासतं. मुलीची बॅट लिफ्ट, बॅट स्विंग आणि फटके मारण्याची पद्धत पाहण्यासारखी आहे. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये मुलीचं खूप कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Female Cricket (@femalecricket)

 

महत्त्वाच्या बातम्या-

“मला मयंक यादवचा सामना करायचाय, त्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला यावं”, स्टीव स्मिथचं खुलं आव्हान

लखनऊला बसला मोठा धक्का! 6.4 कोटी रुपयांचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

याच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे वाचला अनेकांचा जीव! जाणून घ्या, कसा घडला वेगाचा बादशाह मयंक यादव

 

 

Related Articles