IPLक्रिकेटटॉप बातम्या

लखनऊला बसला मोठा धक्का! 6.4 कोटी रुपयांचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी (2 एप्रिल) संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. लखनऊनं हा सामना 28 धावांनी जिंकला. या विजयानंतर लखनऊनं गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र, संघाचा हा आनंद अवघे 24 तासही टिकू शकला नाही.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडलाय. या वेगवान गोलंदाजाचं नाव आहे शिवम मावी.

25 वर्षीय मावीला आयपीएल 2024 च्या लिलावात लखनऊनं तब्बल 6.4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. अहवालानुसार, मावी सीझनच्या सुरुवातीपासूनच पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळेच त्यानं या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळला नव्हता. आता त्यानं दुखापतीमुळे संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ फ्रँचायझीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये शिवम मावी सुपर जायंट्सच्या शिबिरातून बाहेर पडताना दिसत आहे.

शिवम मावीनं 2018 च्या अंडर-19 विश्वचषकात आपल्या अचूक गोलंदाजीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो टीम इंडियासाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्यानं 17.57 च्या सरासरीनं 7 बळी घेतले आहेत. याशिवाय तो आयपीएलमध्येही 32 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्यानं 31.4 च्या सरासरीनं 30 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. शिवम मावी बराच काळ कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. त्याची खास बाब म्हणजे, तो सतत 140 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करू शकते. याशिवाय तो खालच्या फळीत तात्पुरती फलंदाजीही करू शकतो.

तसं पाहिलं तर, शिवम मावीचं दुखापतीशी खूप जुनं नातं आहे. आपल्या छोटेखानी कारकिर्दीत तो अनेकदा जखमी झाला आहे. तो या आधीही दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर होता. तो ऑगस्ट 2023 पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

याच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे वाचला अनेकांचा जीव! जाणून घ्या, कसा घडला वेगाचा बादशाह मयंक यादव

काय सांगता! सुपरमॅनच्या कपड्यात दिसला ईशान किशन, विमानतळावरील फोटो व्हायरल

मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार

Related Articles