दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत त्याच्या लांब-लांब षटकारांसाठी आणि चपळ विकेटकीपिंगसाठी ओळखला जातो. याशिवाय तो विकेटच्या मागे मजेशीर कमेंट्स करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. मात्र फार कमी लोकांना माहित असेल की, तो एका मुलीच्या प्रेमात वेडा आहे!
वास्तविक, ऋषभ पंत ईशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये दोघं एकत्र दिसत आहेत. ईशा नेगीनं 16 जानेवारी 2019 रोजी ऋषभ पंतसोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ईशाने लिहिले होते – “माझा माणूस, माझा जीवनसाथी, माझा सर्वात चांगला मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम @RishabhPant”. या दोघांच्या इन्स्टा अकाऊंटवर आजही हा फोटो आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला होता. कार अपघातानंतर पंतनं पहिला फोटो पोस्ट केला तेव्हा ईशाने त्यावर कमेंट करताना ‘फायटर’ असं लिहिलं होतं.
अनेक रिपोर्ट्सनुसार, ईशा आणि ऋषभनं वयाच्या 19 व्या वर्षी डेट करायला सुरुवात केली होती. आयपीएल 2022 दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहण्यासाठी ईशा एकदा दिल्लीला आली होती. तिचे तेव्हाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. ईशा नेगीचे इंस्टाग्रामवर 3 लाख 17 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. युजवेंद्र चहल, अक्षर पटेल यांच्यासह अनेक क्रिकेटपटूही तिला फॉलो करतात. ईशा नेगीनं इन्स्टाग्रामवरील तिच्या बायोमध्ये स्वत:ला उद्योजक म्हणून लिहिलं आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
ऋषभ पंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 101 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 34.53 च्या सरासरीनं 2935 धावा केल्या आहेत. याशिवाय पंतनं भारतासाठी 33 कसोटीत 2271 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावे 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 865 धावा आहेत. ऋषभ पंतनं टीम इंडियासाठी 66 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत
सात वर्षांचा ‘थाला’! एकापाठोपाठ एक मारतो हेलिकॉप्टर शॉट! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क