१९८३ च्या विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उत्सवामध्ये बुडाला होता. जेव्हा हे सेलिब्रेशन चालू होते, तेव्हा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर तिथे पोहोचले. कपिल देव यांनी ‘स्ट्रेट फ्रॉम हार्ट’ या आत्मचरित्रात लिहिले आहे, “जेव्हा आम्ही ‘ड्रेसिंग रूम’ मधून बाहेर पडलो, तेव्हा ‘साउथ हॉल’ मधून आलेले काही पंजाबी नाचू लागले. त्यानंतर कोणीतरी मला सांगितले की शशी कपूर बाहेर उभे आहेत आणि त्यांना आत यायचे आहे. मी दोन संघ सदस्यांना घेऊन त्यांना आणण्यासाठी बाहेर गेलो. त्या दिवशी आम्ही लॉर्ड्सचे सर्व नियम तोडले होते.”
कपिलने लिहिले, “कोट आणि टाय घातल्याशिवाय लॉर्ड्सच्या मुख्य रिसेप्शनमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. आम्ही शशी कपूरसाठी (Shashi Kapoor) टायची व्यवस्था तर केली. परंतु तो इतका लठ्ठ होता की आमच्यातील कोणाचाही कोट त्याला फिट आला नाही. पण शशी कपूर हा स्मार्ट माणूस होता. त्याने एका स्टार सारखा कोट खांद्यावर टाकला. आणि टाय बांधून आत प्रवेश केला. आणि मग त्याने आमच्या बरोबर आनंद साजरा केला.”
१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी विश्वचषकाच्या अनुभवाबद्दल एका मुलाखतीत सांगितले, “भारतीय संघ विश्वविजेता बनला आहे, यावर माझा विश्वास बसत नव्हता. यावर विश्वास ठेवण्याच्या प्रयत्नातलॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहून २० सिगारेट केवळ काही तासांमध्ये ओढले.”
१९८३ विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, “जेव्हा हॉटेलमध्ये जाऊन पार्टी झाली, तेव्हा खेळाडू ड्रिंक्स पित होते आणि आनंद घेत होते. परंतू त्यांना चिंता होती की या पार्टीचे पैसे कोण देणार. कारण त्यावेळी खेळाडूंना खूप मर्यादित बजेट दिले जात होते.”
कपिलने विनोदाने म्हटले, “मी विचार करत होतो की आता हॉटेलमधील भांडी घासावी लागणार. परंतू नंतर मला आश्चर्य वाटले की पार्टीचे पैसे कोणी दिले. मला माहित नाही की त्या पार्टीचे पैसे कोणी दिले.”
संघात असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज सुनील वल्सनला (Sunil Valson) विश्वचषका दरम्यान एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. विश्वचषकानंतरही त्याला कधीही वनडे खेळण्याची संधी मिळाली नाही.
विश्वचषकादरम्यान भारतीय संघाबरोबर प्रशिक्षक आणि फिजिओ नव्हता. अशा परिस्थितीत मोहिंदर अमरनाथने (Mohinder Amarnath) संघाच्या प्रशिक्षण सत्रात मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यांनीच कपिल देव आणि सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्याबरोबर मिळून फलंदाजी व गोलंदाजीचा क्रम निश्चित केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार
-भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
-भारताचा एकेवेळचा स्टार ऑलराऊंडर रॉबीन सिंगची कार पोलीसांनी केली जप्त, चेन्नई शहरात…