न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना झारखंडची राजधानी रांची येथे पार पडला. शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ७ विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणारा तिसरा टी२० सामनाही जिंकत भारतीय संघ न्यूझीलंडला मालिकेत क्लिन स्वीप करण्याच्या प्रयत्नात असेल.
परंतु या सामन्यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेता शशी थरूर हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. थरूर हे क्रिकेटचे चाहते असून ते सुद्धा प्रत्यक्षात भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटण्यासाठी रांचीला गेले होते.
भारताने दमदार प्रदर्शन करत हा सामना जिंकल्याने थरूर खूप आनंदात दिसून आले. परंतु त्यांनी येत्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यासंदर्भात विचित्र अशी मागणी केली आहे. थरूर यांचे म्हणणे आहे की, तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्यावी. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचाही सहभाग असावा व त्याच्याजागी श्रेयस अय्यरकडे नेतृत्त्वपद सोपवण्यात यावे.
थरूर यांनी ट्वीटरद्वारे आपले मत मांडले आहे. सामना पाहण्यासाठी आल्याचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘भारतीय संघाला टी२० मालिका जिंकताना पाहून खूप बरे वाटले. पण मला वाटते की पुढील सामन्यात आपण त्या खेळाडूंना विश्रांती द्यायला पाहिजे, ज्यांनी मागील २ सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि दिपक चाहर यांना विश्रांती दिली जावी. तर बाकावर बसवलेल्यापैकी श्रेयर अय्यरला नेतृत्त्वपदी विराजमान करत आपल्यातील क्षमता दाखवण्याची संधी दिली जावी.’
Great to watch India wrap up the T20 series. For the last match we should rest those who have amply shown their wares: @ImRo45 @klrahul11 @RishabhPant17 Bhuvi &DChahar. Let the bench show its strength. @ShreyasIyer15 can captain. @BCCI
[pix:@SZARITA @AalimJaveri, @AmbaPrasadINC] pic.twitter.com/0HblvXvBMW— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 19, 2021
दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात सुरुवातीपासूनच यजमानांचे प्रभुत्त्व पाहायला मिळाले. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी निवडत पाहुण्या संघाच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. न्यूझीलंडचा एकही फलंदाज या सामन्यात अर्धशतकाच्या जवळही पोहोचू शकला नव्हता. त्यांना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर फक्त १५३ धावा करता आल्या होत्या. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १८ षटकातच त्यांचे आव्हान पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पण करण्यापूर्वी द्रविडने काय दिला होता सल्ला? हर्षल पटेलने केला खुलासा
जरा विचित्रच! बांगलादेशविरुद्ध फलंदाजीवेळी दुर्लक्ष करणे शोएब मलिकला भोवले, ‘असा’ झाला रनआऊट