भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे कोरोना पॉजिटिव्ह आढळले. हा संघासाठी आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. कारण एशिया कप (Asia Cup) सुरू होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. अशातच स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी आठवडाभर आधीच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एशिया कपसाठी जात असताना झालेल्या नियमित चाचणीमध्ये द्रविड यांना कोरोनाचे काही लक्षणे आढळली. आता यावर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याविषयी म्हटले, “द्रविड हे कोरोनाच्या विळख्यात आले असले तरी घाबरून जायचे काही कारण नाही. मला नाही वाटत याने काही फरक पडेल. तुम्ही त्याला कोविड-१९ नाही म्हणू शकत, तो फक्त एक फ्लू आहे. द्रविड हे तीन-चार दिवसांतच पूर्णपणे ठीक होऊन मैदानावर परतेल.”
शास्त्री यांनी कोरोनाबाबत आधीही आपले मत व्यक्त करताना म्हटले होते, की जर भारत इंग्लंडच्या दौऱ्यातील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला असता तर ती कसोटी मालिका सहज जिंकला असता. मात्र कोरोनामध्ये अधिक वाढ झाल्याने तो शेवटता कसोटी सामना रद्द करण्यात आला. तर तो अंतिम सामना जुलै २०२२मध्ये खेळला गेला. ज्याचा निकाल २-२ असा लागला.
एशिया कप २०२२साठी संपूर्ण भारतीय २३ ऑगस्ट रोजी युनायटेड अरब अमिराती (युएई) येथे जमणार आहे. सध्या द्रविड हे भारतीय नियामक मंडळाच्या मेडिकल पथकाच्या देखरेखीत आहेत. ते जसे बरे होतील त्वरीत भारतीय संघाशी ते जोडले जाणार आहेत. त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाईल आणि ती चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर द्रविड संघासोबत जोडले जाणार असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
पाकिस्तानी दिग्गजाने केली आपल्याच संघाची पोलखोल; म्हणाला, “आमचा संघ…”
लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट