ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज शॉन मार्श याने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शुक्रवारी (10 मार्च) मार्शने ही मोठी घोषणा केली. ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळताना नेहमी वरच्या फळीत फलंदाजी करत असायचा. आयपीएल 2008 मध्ये मार्शने सर्वात जास्त धावा ठोकण्याची कामगिरी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे.
शॉन मार्श (Shaun Marsh) याने 2001 साली वयाच्या 17 व्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच मागच्या हंगामात शेफिल्ड शिल्डला विजेतेपद पटकावण्यासाठी मार्शचे योगदान महत्वाचे राहिले. बीसीसीआयने 2008 साली पहिला आयपीएल हंगामा आयोजित केला होता. मार्शने या पहिल्या आयपीएल हंगामात सर्वाधिक 616 धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मार्शने 183 सामने खेळले, ज्यामध्ये 12032 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मार्शच्या नावावर 32 शतक, तर 58 अर्धशतकांची नोंद आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये मार्शने 177 सामन्यांमध्ये 7158 धावा केल्या. लिल्ट ए फॉरमॅटमध्ये मार्शने 19 शतक आणि 38 अर्धशतके ठोकली. मार्श ऑस्ट्रेलियन संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये केळला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 38 सामने खेलले, ज्यात 34.31च्या सरासरीने 2265 धावा केल्या आहेत. वनडे कारकिर्दीत त्याने 73 सामन्यांमध्ये 2773 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने त्याचा शेवटचा सामना 2119 मध्ये खेळला होता.
मार्शची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जबरदस्त राहिली आहे, पण 2017-2018 साली ऍशेस मालिकेतील त्याचे प्रदर्शन नेहमीच लक्षात राहणारे आहे. मार्श या ऍशेस मालिकेत स्टीव स्मिथच्या नंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने मालिकेतील 5 सामन्यांमध्ये 74.16च्या सरासरीने 445 धावा केल्या होत्या. 156 धावा ही त्याची सर्वात्तम खेळी राहिली होती.(Shaun Marsh announced his retirement from first-class and ODIs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण