भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा शेवटचा सामना असून भारतीय संघ अडचणीत असल्याचे दिसते. पहिल्या दिवसापाठोपाठ अहमदाबादमध्ये दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियान फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ईशान किशन अहमदाबाद कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी रोहित शर्मा सोबतचा त्याचा मैदानातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवला. रोहित पण तिसऱ्या कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत पुनरागमन करू शकला. गुरुवारी (9 मार्च) उभय संघांतील शेवटचा कसोटी सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन या जोडीने भारतीय गोलंदाजांचा खाम काढला.
भारतीय संघ विकेट्सच्या शोधात होता, पण ख्वाजा आणि ग्रीन जोडी मात्र विकेट सोडण्याच्या तयारीत नव्हती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ कडक उन्हात विकेट्स मिळवण्याच्या प्रयत्नात होता. अशात मैदानातील खेळाडूंना पाणी पाजताना ईशान किशन (Ishan Kishan) पाहायला मिळाला. कर्णधार रोहित शर्मा पाणी पिल्यानंतर हातातील पाण्याची बॉटल ईशानच्या हातात देताना दिसला. पण ईशान घाईत असल्यामुळे ईशानला ही बॉटल पकडता आली नाही. ईशानकडून बॉटल खाली पडल्यानंतर कर्णधार रोहित त्याला फटका मारण्याची ऍक्शन करताना दिसला. दरम्यान, रोहित यापूर्वीही संघातील सहकारी खेळाडूंशी अशा पद्धतीने मजा मस्ती करताना पाहिला गेला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ रोहित आणि ईशानव्यतिरिक्त रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील दिसत आहे.
Indian Captain Rohit Sharma's bad behaviour with junior Ishan Kishan #RohitSharma #vadapav #ishankishan #DCvsMI #MumbaiIndians #DelhiCapitals #NarendraModiStadium #Shami #viratkholi #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/utC0PfUR48
— ADITYA RAJPUT (@adityar4jput) March 9, 2023
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण
पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई मारियाचे निधन, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाली श्रद्धांजली