आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. सीएसकेने हंगामात आतापर्यंत १२ पैकी ९ सामन्यात विजय मिळवला असून १८ गुणांसह संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. असे असले तरी, संघात एक कमतरता जाणवतेय. संघाचा महत्वाचा फलंदाज सुरेश रैना संपूर्ण हंगामात खराब फार्ममध्ये दिसला आहे. रैनाने हंगामातील पहिल्या सामन्यात अर्धशतक केले होते, पण त्यानंतर त्याने एकदाची अपेक्षेप्रमाणे खेळी केली नाही. अशातच आता दक्षिण अफ्रिकेचे माजी कर्णधार शॉन पोलॉक यांनी सीएसके संघ व्यवस्थापनाला एक सल्ला दिला आहे.
पोलॉकचा रैनावर निशाणा
रैना हंगामात सतत अपयशी ठरत असला तरी सीएसकेने त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. याबाबत दक्षिण अफ्रिकेचे माजी कर्णधार शॉन पोलॉक म्हणाले की, “रैनाला पाहून असे वाटते की, ते काही दुखापतीसोबत खेळत आहेत. तो जास्त स्फूर्तीवान दिसत नाहीत, जसे तो पहिले दिसायचा. अप्रतिम क्षेत्ररक्षण, ऑफस्पिन गोलंदाज म्हणून त्याचे योगदान असते. तो सातत्याने चेंडूंना सीमारेषेपार पाठवत राहायचा. आम्ही यावेळी हे सर्व नाही पाहिले.”
प्लेऑफच्या आधी संघात बदल करावा, उथप्पाला दिली जावी संधी
चेन्नईने रॉबिन उथप्पासारखा अनुभवी खेळाडू मैदानाबाहैर बसलेला असूनही सुरेश रैनाला संघात कायम ठेवले आहे. याबाबत पोलॉक म्हटले की, “मला माहित करून घ्यायचे आहे की, रॉबिन उथप्पाला संधी दिली जाईल का? चेन्नई एक असा संघ आहे, जो जास्त बदल करत नाही. नॉक आऊटआधी उथप्पाला संधी मिळेल असा मला विश्वास आहे.”
गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे चेन्नई
सीएसके सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा पुढचा सामना आज (४ ऑक्टोबर) गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानावरच्या दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. या सामन्यात विजयी होणार संघ गुणतालिकेतील पहिले स्थान निश्चित करेल.