शॉन पोलॉकची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचे वडील, आजोबा, काका सगळे क्रिकेटपटू होते. नोव्हेंबर १९९५ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेसाठी ४०० कसोटी बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. हॅन्सी क्रोनिएनंतर तो संघाचा कर्णधार झाला. पण, २००३च्या विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला कर्णधारपद गमवावे लागले.
दक्षिण आफ्रिकेने जगाला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू दिले आहेत. यापैकी एक होता शॉन पोलॉक. जेव्हा त्याच्या हातात चेंडू असायचा तेव्हा तो फलंदाजांना धावांसाठी तडफडत असे आणि जेव्हाही त्याला संधी मिळते तेव्हा तो बॅटने चांगलाच फटकेबाजी करत असे. तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही होता. आज पोलकबद्दल बोलले जाते कारण, १६ जुलै रोजी त्याचा वाढदिवस आहे. पोलॉकच्या रक्तात क्रिकेट होते, त्यामुळे क्रिकेटर होण्यासाठी त्याला बाहेरून प्रेरणा घ्यावी लागली नाही. त्याचे वडील पीटर पोलॉक दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळले.
शॉन पोलॉकचे वडील पीटर हे ६०च्या दशकात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचे प्रमुख होते. तर अंकल ग्राम पोलॉक हे जगातील सर्वोत्तम डावखुऱ्या फलंदाजांमध्ये गणले जातात. शॉनचे आजोबा, पणजोबा आणि भाऊही क्रिकेटपटू होते. अशा परिस्थितीत शॉनच्या क्रिकेटर बनण्याचा पाया घरातूनच घातला गेला. १९९५-९६ मध्ये इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
नोव्हेंबर १९९५मध्ये पोलॉकने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पहिल्याच डावात त्याने ३ विकेट घेत आपले कर्तृत्व सिद्ध केले. पोलॉकने जानेवारी २००६मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, पोलॉकने अष्टपैलू खेळ दाखवला. २००७मध्ये तो चौथा विश्वचषक खेळला होता. त्याच वर्षी त्याने क्रिकेटला अलविदा केला. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ७ हजारांहून अधिक धावा केल्या. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८००हून अधिक विकेट घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल





