ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) पुढील महिन्यात श्रीलंकेतील हंबनटोटा येथे पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ही घोषणा केली आहे. टेटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाची जबाबदारी घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. टेटने 2004 ते 2016 या वर्षादरम्यान, तीनही प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
टेटला ‘द वाइल्ड थिंग’ असेही म्हटले जाते, त्याला जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने इंग्लंडविरुद्ध 2010 मध्ये 161.1 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला जो एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान चेंडू होता.
टेटने, 3 कसोटी, 35 एकदिवसीय आणि 21 टी-20 मध्ये अनुक्रमे पाच, 62 आणि 28 बळी मिळवले आहेत. त्याने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने त्या विश्वचषक स्पर्धेत 11 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या होत्या.
टेटने कोपरच्या दुखापतीमुळे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याने क्रिकेट प्रशिक्षणात हात आजमावुन पाहिला. तो ‘बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सच्या गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिका श्रीलंकेतील महिंद्रा राजपक्ष स्टेडियम, हंबंनटोटा येथे होणार आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघात पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग आहे. आयसीसी सुपर लीगच्या गुणतालिकेतील पहिले ७ संघ २०२३ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. तसेच या विश्वचषकाचा आयोजक म्हणून भारत आधीच पात्र ठरलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडकडून जाणार एनसीए संचालकपद? बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“माझ्यासाठी खेळानंतरच स्टाईल”, ‘त्या’ निर्णयाबाबत नीरजचा महत्त्वपूर्ण खुलासा
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी सकारात्मक, ‘या’ वर्षी होऊ होऊ शकते सुरुवात