ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट (shaun tait) याने बुधवारी बांगलादेश संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली. टेट सध्या बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्ये चटगाव चॅलेंजर्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. ही स्पर्धा २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बांगलादेश संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाविषयी बोलताना टेट म्हणाले की, होय या पदासाठी मी नक्कीच इच्छूक आहे.
टेटने नुकतीच अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. टेटने सांगितल्याप्रमाणे, बांगलादेश क्रिकेट बोर्डला (BCL) याविषयी विचार करण्यासाठी काही वेळ हवा आहे की, त्यांना या पदासाठी कोणाला नियुक्त करायचे आहे. टेटच्या मते, त्याच्यासाठी हे एक चांगले काम आहे. यापूर्वी या पदावर ओटिस गिब्सन कार्यरत होते. काही काळापूर्वी त्यांचा बांगलादेश संघासोबतचा करार संपला आणि त्यांनी तो पुढे न वाढवल्यामुळे संघाला नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
टेट पुढे बोलताना म्हणाला की, बांगलादेश क्रिकेट सध्या ज्या पातळीवर आहे, त्याठिकाणी खूप सारे चांगले खेळाडू आहेत. ते महान खेळाडू बनू शकतात. शरीफुल एक डाव्या हाताचा आक्रमक गोलंदाज आहे. तो या संघासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. त्याने जेवढे क्रिकेट खेळले आहे, त्यावरून त्याला ओळखणे पुरेसे आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.
बांगलादेश संघाकडे युवा खेळाडू आणि विशेषतः वेगवान गोलंदाच चांगल्या गुणवत्तेचे आहेत. याच कारणास्तव येत्या पाच सहा वर्षांमधील बांगलादेश संघाचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. टेटने बांगलादेशच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी उत्सुकता दाखवल्यानंतर बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन अध्यक्ष जलाल यूनुस खास प्रतिक्रिया दिली. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना यूनुस म्हणाले की, त्यांना ही गोष्ट कळाल्यानंतर आनंद झाला की, टेट त्यांच्यासोबत काम करू इच्छितात. परंतु त्यांनी असेही सांगितले की, बोर्ड याविषयी काही निर्णय घेण्यापूर्वी टेटचे बीपीएलमधील प्रदर्शन कसे राहील हे देखील पाहणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन फलंदाजीतही सुसाट; पाच गगनभेदी षटकारांची केली आतिषबाजी
पहिल्या सामन्यातील पराभवासाठी राहुलने ‘या’ खेळाडूंना ठरविले दोषी; म्हणाला…
आक्रमक फलंदाजी अन् हटके शॉट! चाहते म्हणाले, हा भविष्यातील ‘मिस्टर ३६०’, पाहा कोण आहे तो फलंदाज
व्हिडिओ पाहा –





