---Advertisement---

अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी

On: मंगळवार, मार्च 23, 2021 4:59 PM
---Advertisement---

आयसीसीने नुकतीच महिला क्रिकेटपटूंची टी२० व वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या टी२० संघाची युवा सलामीवीर शेफली वर्मा ही फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाली. भारतीय वनडे संघाची कर्णधार मिताली राज हिच्यादेखील क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

आयसीसीची नवी क्रमवारी
आयसीसीने आज (२३ मार्च) महिलांची वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय टी२० संघाची धडाकेबाज १७ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा हिने पुन्हा एकदा फलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी बेथ मुनी तिला मागे टाकत तिने हे स्थान आपल्या नावावर केले. शेफाली यापूर्वी २०२० महिला टी२० विश्वचषकानंतर देखील प्रथमस्थानी पोहोचली होती. शेफाली व्यतिरिक्त स्मृती मंधना व जेमिमा रॉड्रिग्ज या भारतीय फलंदाज पहिल्या दहामध्ये अनुक्रमे सातव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीचे बक्षीस
सध्या भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला यांच्यादरम्यान लखनौ येथे तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिका महिलांनी पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली आहे. मात्र, शेफाली हिने दोन्ही सामन्यात आक्रमक फलंदाजी करत अनुक्रमे २२ व ४७ धावांच्या खेळ्या केल्या होत्या. त्याचेच बक्षीस म्हणून तिला हे स्थान मिळाले आहे.

पहिल्या दहामध्ये असणाऱ्या इतर भारतीय महिला क्रिकेटपटू

स्मृती मंधना व भारतीय वनडे संघाची कर्णधार मिताली राज या महिला फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानी आहेत. वनडे गोलंदाजांच्या यादीत अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी पाचव्या तर, अनुभवी लेगस्पिनर पूनम यादव आठव्या क्रमांकावर आहेत. दीप्ती शर्मा हीदेखील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्यास्थानी विराजमान आहे.
टी२० गोलंदाजांच्या यादीत दीप्ती शर्मा वर राधा यादव अनुक्रमे सातव्या-आठव्या क्रमांकावर, तर टी२० अष्टपैलूच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा ही चौथ्या स्थानी कायम आहे.

महत्वाच्या बातम्या:

Video: पंड्या कुटुंबासाठी भावूक क्षण; हार्दिककडून वनडे कॅप स्वीकारताना कृणालला आली वडिलांची आठवण

बडेमियाँ-छोटेमियाँ! भारताकडून क्रिकेट मैदानं गाजवलेल्या ३ भावांच्या जोड्या

भारत का इंग्लंड, वनडे मालिकेत कोण मारणार बाजी? इंग्लिश दिग्गजाने केली भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---