---Advertisement---

मंधनापाठोपाठ शेफाली वर्मानेही घेतली ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार, ‘हे’ आहे कारण

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 8:23 PM
---Advertisement---

भारताची स्टार महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने ‘द हंड्रेड’मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेफाली बर्मिंघम फिनिक्ससाठी ओव्हल इनविन्सिबल्स विरुद्ध द हंड्रेड्स एलिमिनेटरचा सामना खेळणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी शेफाली भारतात परतली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू बेंगळुरूमध्ये एकत्र येत आहेत. द हंड्रेडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना देखील या शिबिरात सामील व्हायचे आहे. मात्र, इंग्लंडहून परतल्यानंतर या खेळाडूंना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.

शेफाली गेल्या तीन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये होती. शेफालीने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी -२० आणि एकदिवसीय मालिकेत भाग घेतला होता. यानंतर तिने द हंड्रेड लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. याशिवाय स्मृती मंधानाने द हड्रेंडमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या साऊदर्न ब्रेव्ह संघ देखील द हंड्रेडच्या बाद फेरीमध्ये पात्र ठरली. परंतु, सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मंधनाने या स्पर्धेतून माघार घेत आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती देखील इंग्लंडहून मायदेशी परतली आहे.

शेफालीने ७६ धावांची खेळी खेळली
शेफालीसाठी द हंड्रेंड स्पर्धा संमिश्र होती. ती फक्त एकदाच २५ पेक्षा जास्त धावा करू शकली. मात्र, यामध्ये तिने ४२ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या आणि तिच्या संघाला वेल्श फायरविरुद्ध विजय मिळवून दिला. या खेळीमुळे तिचा संघ पुढच्या टप्प्यात पोहोचू शकला.

इन्स्टाग्रामवर तिने तिच्या संघातील खेळाडूंसोबत एक फोटो पोस्ट करत लिहिले की, “मला या संघासोबत खेळताना खरचं खूप आनंद झाला. मैत्री आणि आठवणी नेहमी सोबत राहतील. संघाला बाद फेरीसाठी शुभेच्छा.”

https://www.instagram.com/p/CSt4IgMtthC/

त्याचवेळी फिनिक्सची कर्णधार एमी जोन्सने कबूल केले की, शेफालीची माघार खरोखरच एक मोठे नुकसान आहे, पण संघ इतका मजबूत आहे की तिची उणीव भासणार नाही. जोन्स म्हणाली, “वेल्श विरुद्ध ती किती आक्रमक क्रिकेट खेळत होती हे प्रत्येकाने पाहिले. तिचे जाणे एक मोठे नुकसान आहे. मात्र, आम्ही भाग्यवान आहोत की, आमच्याकडे मॅरी केली, थेआ ब्रुक्स आणि रिया फॅकरल सारखे पॉवर हिटर्स आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या – 

नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर

व्हिलचेअर असूनही स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो व्हायरल

“… म्हणून मला लॉर्ड्स कसोटीत संधी मिळाली नाही”, स्वतः अश्विनने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---