सध्या सुरु असलेल्या महिला आशिया चषकामध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि सलामीवीर शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी श्रीलंकेत सुरु असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेत आयसीसी महिला खेळाडूंच्या टी20 क्रमवारीत मुसंडी मारली आहे. ताज्या टी20 क्रमवारीत हरमनप्रीत आणि शफाली संयुक्तपणे 11व्या स्थानावर आहेत.
आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हरमनप्रीतनं पाकिस्तानविरुद्ध नाबाद 5 धावा आणि यूएईविरुद्ध 66 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यामुळे तिला टी20 क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. तर शफालीनं पहिल्या सामन्यात 40 आणि शेवटच्या सामन्यात केलेल्या 37 धावांमुळे तिला चार स्थानांचा फायदा झाला आहे.तर भारतीय उपकर्णधार स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) आयसीसी टी20 क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे.
भारतीय महिला संघाची यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषनं (Richa Ghosh) आयसीसी टी20 क्रमवारीत 4 स्थानांनी मुसंडी मारली आणि 24व्या स्थानावर झेप घेतली. तर भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलनं (Shreyanka Patil) गोलंदाजांच्या आयसीसी टी20 क्रमवारीत 19 स्थानांनी मुसंडी मारुन 41व्या स्थानावर झेप घेतली आहे.
भारतीय महिला संघानं यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup) पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला धूळ चारुन विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात युएई संघावर दणदणीत विजय मिळवला. युएईविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक रिचा घोष या दोघींनी अनुक्रमे 66, 64 धावांची खेळी खेळली आणि भारताला सामना जिंकून दिला. आज (23 जुलै) रोजी तिसऱ्या सामन्यासाठी भारत नेपाळशी भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या तुलतेत किती पुढे चीन-अमेरिका? ऑलिम्पिकमध्ये किती सुवर्ण पदक जिंकले? जाणून घ्या टॉप 5 देश
भारतीय कर्णधारानं सांगितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण…!!!
फेडरर-नदालच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या दिग्गजाचा टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट