---Advertisement---

शेफाली वर्मा १७ नव्हे तर २८ वर्षांची? जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण

On: सोमवार, जून 28, 2021 12:01 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघाची युवा विस्फोटक फलंदाज शेफाली वर्मा हिने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या शेफालीने २७ जून रोजी इंग्लंडविरुद्ध खेळताना भारतीय वनडे संघातही आपले पाऊल ठेवले आहे. परंतु, टीव्ही ब्रॉडकास्टरने तिच्याबाबतीत केलेल्या एका चुकीमुळे सध्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेफाली वर्मा हिने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.पदार्पण करताच ती भारतीय संघासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली आहे. मात्र, तिला पहिल्या वनडे सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. ती अवघ्या १५ धावा करत माघारी परतली.

शेफाली वर्मा ही अवघ्या १७ वर्षांची आहे. परंतु, ती जेव्हा पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी आली, तेव्हा टीव्ही ब्रॉडकास्टरने तिचं वय १७ दाखवण्याऐवजी २८ दाखवले होते. हे पाहून चाहत्यांचा संताप अनावर झाला होता. याचा स्क्रीनशॉट चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर करत, टीव्ही ब्रॉडकास्टरवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच अनेकांनी बीसीसीआयला देखील हा स्क्रीनशॉट शेअर करत टॅग केले आहे.(Shefali verma wrong age broadcasted on tv during Bristol odi fans reacted)

https://twitter.com/impriyafan/status/1409099331458670595

https://twitter.com/Ayush19061/status/1409090724340154369

शेफाली वर्माला भारतीय संघाची अनुभवी कर्णधार मिताली राजने पदार्पणाची कॅप दिली. मितालीने या सामन्यात ७२ धावांची खेळी केली. परंतु, भारतीय संघाला या सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना मितालीच्या अर्धशतकाच्या जोरावर २०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने अवघ्या २ विकेटच्या मोबदल्यात २०२ धावांचे आव्हान गाठले होते. इंग्लंडकडून डाव्या हाताची फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोनने ४० धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या.

इंग्लंड संघाकडून फलंदाजी करताना नेट स्कायव्हरने नाबाद ७४ धावांची आणि टेमी ब्युमोंटने नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली होती. या विजयासह इंग्लंड संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे दुसऱ्या टी२०मध्ये दमदार पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवला दणदणीत विजय

सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

अमेरिकेचा ‘हा’ धावपटू भविष्यातील ‘वेगाचा बादशाह’? वयाच्या १७ व्या वर्षी मोडलाय उसेन बोल्टचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---