सध्या भारतीय फुटबॉलमध्ये अनेक विदेशी संघ गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. काही महिन्यांपूर्वी, मॅनचेस्टर सिटी व मुंबई सिटी एफसी तसेच, बोरूशिया डॉर्टमंड आणि हैदराबाद एफसी यांच्यात भारतीय फुटबॉलमध्ये सुधारणेसाठी करार झाले आहेत. नुकतेच, सौदी अरेबियातील युनाइटेड वर्ल्ड ग्रुपने केरळमधील कोझिकोडेस्थित क्वार्ट्ज फुटबॉल क्लब खरेदी केला आहे. काही दिवसांत क्वार्ट्ज क्लबला एफसी केरळ युनायटेड म्हणून पुनर्नामित केले जाईल.
क्वार्ट्ज एफसीचा मालकीहक्क मिळवल्यानंतर, युनायटेड वर्ल्ड ग्रुपच्या मालकीच्या संघांची संख्या चार झाली आहे. युनायटेड वर्ल्ड ग्रुपकडे याआधी, बेल्जियममधील के बीर्सकोट व्ही, युएईमधील अल हिलाल युनायटेड आणि प्रीमियर लीगमधील शेफिल्ड युनायटेड या संघांची मालकी आहे. युनायटेड वर्ल्ड ग्रुपला, कोलकाता किंवा मुंबई येथील संघात गुंतवणूक करायची होती. मात्र, केरळमधील फुटबॉल प्रेम पाहून त्यांनी क्वार्ट्ज फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले.
केरळमधील दोन संघ यापूर्वीच भारतीय फुटबॉलमधील अव्वल दोन स्पर्धांमध्ये खेळत आहेत. केरळा ब्लास्टर्स इंडीयन सुपर लीग, तर गोकुलम एफसी आय-लीगमध्ये सहभागी होत असतात. क्वार्ट्ज एफसी सध्या आय-लीग सेकंड डिव्हिजनमध्ये खेळत आहे. क्वार्ट्ज एफसी व युनायटेड वर्ल्ड ग्रुप यांच्यातील कराराची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल संघ पोहोचले गोव्यात; ‘या’ चार संघांनी सराव केला सुरू
ISL: लिव्हरपूलचा दिग्गज बनला ईस्ट बंगालचा प्रशिक्षक
अर्जेटिनाने चारली इक्वेडोरला धूळ; मेस्सीने केला निर्णायक गोल
ट्रेंडिग लेख –
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू






