नाशिक । नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनतर्फे आयोजित शेगाव सायकल रॅलीस आज शुक्रवारी (दि.14) श्री गजानन महाराजांच्या नामघोष करत उत्साहात सुरुवात झाली. शिवशक्ती सायकल्स, गंगापूर नाका येथून नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, डेअरी पॉवरचे भगवान सानप यांनी हिरवा झेंडा दाखवला.
या रॅलीमध्ये 100 हुन अधिक सायकलिस्टस सहभागी झाले असून पुढील 3 दिवस तब्बल 390 किमीची अंतर पार करत शेगाव श्रीक्षेत्र श्री गजानन महाराजांचे दर्शन सायकलिस्टस घेतील.
शेगाव रॅलीचे हे सलग तिसरे वर्ष असून या रॅलीत 9 वर्षांपासून ते 73 वर्षांपर्यंतचे महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. पर्यावरण संवर्धनाला अध्यात्मिकतेची जोड देण्याचा याद्वारे प्रयत्न असून नाशिक सायकलिस्टस दरवर्षी पंढरपूर सायकल वारीचेही आयोजन करते.
सायकलिस्टस पहिल्या दिवशी 160 किलोमीटरचा पल्ला पार करून धुळे येथे मुक्कामी राहिले असून दुसर्या दिवशी 130 किलोमीटरचा मुक्काम जळगाव जवळ आहे.
त्यानंतर तिसर्या दिवशी शंभर किलोमीटरवर शेगावला शेवटचा मुक्काम असून परतीचा प्रवास 16 तारखेला सुरू होणार असल्याची माहिती रॅलीचे समन्वयक डॉ. आबा पाटील यांनी दिली आहे.
या सायकल रॅलीत विशेष करून ‘सायकल चालवा, आरोग्य चांगले ठेवा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश दिला जाणार असून या रॅलीत एकूण 100 हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला भारताचा पहिला डाव
–सिक्कीमच्या फलंदाजाने असा काही पराक्रम केला आहे की ऐकून थक्क व्हाल!
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: मिशेल स्टार्कने दिला तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का