भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर त्याच्या ‘वन लाइनर्स’साठी प्रसिद्ध आहे. प्रत्येकजण त्याच्या हजरजबाबी ट्विट्सने प्रभावित झाला आहे. परंतु कदाचित आता त्याला शेल्डन कॉट्रेलच्या ट्विटमुळे गप्प बसावे लागेल. कारण या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने त्याला हिंदीत ट्रोल केले आहे, ज्यामुळे जाफरची चांगलीच पंचायत झाली आहे.
वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलला इंडियन प्रीमियर लीगमधील पंजाब किंग्सने २०२१ च्या हंगामासाठी कायम ठेवले नसले; तरीही तो त्याच्या संघाशी तितकाच जोडलेला आहे, जितका आधी होता. कॉट्रेलने आपल्या जुन्या फ्रँचायजी पंजाब किंग्जच्या फलंदाजी प्रशिक्षक आणि भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरला ट्रोल केले आहे.
२ सप्टेंबर रोजी कॅरिबियन प्रीमियर लीगच्या सामन्यात सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाने बार्बाडोस रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज कॉटरेलला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. सुरुवातीला एका ऑस्ट्रेलियाई क्रिकेट एजंटने त्याला ट्रोल केले होते. तिने आयपीएलमध्ये कॉट्रेलच्या षटकात सलग ५ षटकार खेचणाऱ्या राहुल तेवतियाचे नाव घेत त्याच्यावर निशाणा साधला होता.
He scores a 6 from the final delivery! I wanna be cheeky because this man becoming a finisher… #workworkwork #awesomehuman #contactme #skn @sknpatriots @SaluteCotterell pic.twitter.com/bydDmr2thk
— Sophie Claire M (@sophmaroc) September 4, 2021
यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, ‘माझा एजंट मला स्लेज करत आहे का? मी तुम्हाला ऑस्ट्रेलियाई न म्हणता एक ऑस्ट्रेलियन दाखवू? अरे यार! तू गाबा विसरलीस का?’ जानेवारी २०२१ मध्ये, चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे ऑस्ट्रेलियाला भारताकडून ३२८ धावांचा बचाव करण्यात अपयश आल्यामुळे पराभूत व्हावे लागले होते.
Is my agent sledging me? Show me you an Aussie without telling me you an Aussie?!
Arre yaar, Gabba bhool gayi kya? #WeBothWorkingHard #jokes #MyAgentWin #contact #windies https://t.co/ZUZJzktxZc— Sheldon Cotterell (@SaluteCotterell) September 4, 2021
त्याचे हे भन्नाट उत्तर पाहिल्यानंतर एका भारतीय चाहत्याने जाफरला विचारले की, ‘त्याने कॉट्रेलला ट्रोल करायला शिकवले आहे का?’ यावर जाफरने कसलेही प्रत्युत्तर दिले नाही. मात्र कॉट्रेलने अजून एक ट्विट करत उत्तर दिले की, ‘आम्ही गोलंदाजीमध्ये जितके प्रयत्न केले तितकेच प्रयत्न जाफरने त्याच्या ट्वीट्सवर केले.’
Hum bowling pe itni koshish karte hai jitna Jaffar apne tweets pe karta hai. https://t.co/EMB7LxLi4k
— Sheldon Cotterell (@SaluteCotterell) September 4, 2021
थोडक्यात कॉट्रेलने वसीम जाफरला अप्रत्यक्षपणे फटकारत जाणीव करून दिली आहे की, तो ट्रोलिंगमध्ये जाफरपेक्षा एक काकण जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच वर्षी ‘हा’ मुंबईकर बनला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार, पाहा इतर शिलेदारांचीही नावे
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचे ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत राहिले विवादात्मक नाते, एक तर आताही नाक मुरडतो!