---Advertisement---

तब्बल ८ फूट २ इंच अफगाण क्रिकेट चाहत्याला भारतात रहायला मिळेना हाॅटेल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 8, 2019 5:28 PM
---Advertisement---

अफगानिस्तान आणि वेस्टइंडी़ज याच्यांत लखनऊ येथे सुरु असलेली वनडे मालिका पाहण्यासाठी आलेल्या काबुलच्या 8 फूट २ इंच उंची असलेल्या क्रिकेट चाहता शेर खानला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.

नाका क्षेत्रामध्ये त्यांची उंची पाहून हाॅटेल मालकांनी त्याला रूम  देण्यास नकार दिला. या सर्व त्रासाला कंटाळून शेरखानने पोलिसांकडून मदत मागितली. कार्यक्षेत्र आधिकारी कैसरबाग सजीव सिन्हा यांना ही माहिती कळताच त्यांनी राजधानीमध्ये एका     रूमची  व्यवस्था केली.

मंगलवारी सकाळी नाका भागात पोहचलेल्या शेरखानला कोणत्याही हाॅटेल मालकाने त्याची उंची पाहून रूम देण्यास नकार दिला. याला कंटाळून शेर खान दुपारी 3 वाजता नाका पोलीस स्टेशन मध्ये पोहचला.

त्याची उंची पाहून तेथील उपस्थित पोलिस आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सर्व  कागदपत्रे तपासली आणि मग त्याच्यासाठी हॉटेलची व्यवस्था करण्यात आली. राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर शेर खान यांनी लखनऊ पोलिसांचे आभार मानले.

1 डिसेंबर रोजी अफगाणिस्तान-वेस्टइंडिजमधील क्रिकेट मालिका संपल्यानंतर शेरखान अफगाणिस्तानात परत जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---