fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या लढती, यावर पाहू शकता थेट प्रेक्षपण!

दादर- शिवनेरी सेवा मंडळाच्या कब्बडी स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त संघानी विविध गटात सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत आज (७ ऑक्टोबर) महत्वपूर्ण लढती होणार आहे.

विशेष व्यावसायिक, व्यावसायिक अ श्रेणी, महिला गट व महाविद्यालयीन अश्या चारही गटाच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत. आजच्या (७ ऑक्टोबर) व अंतिम दिवसांचे (९ ऑक्टोबर) थेट प्रेक्षपण सर्व कबड्डी रसिकांना पाहता येणार आहे. डी-फोकस स्टुडिओ (Dfocus Studio) व खेळ कबड्डी (Khel Kabaddi) या दोन युट्युब चॅनलवर थेट प्रेक्षपण पाहता येईल.

महाविद्यालयीन गटात सिद्धार्थ कॉलेज विरुद्ध ठाकूर कॉलेज व वंदे मातरम कॉलेज विरुद्ध महर्षी दयानंद कॉलेज अश्या लढती होतील. तर व्यावसायिक श्रेणी अ गटात टी. बी. एम स्पोर्ट्स विरुद्ध शिवास एंटरप्राइज व भारत पेट्रोलियम (शिवडी) विरुद्ध इनकम टॅक्स यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील.

महिला गटात विश्वशांती क्रीडा मंडळासमोर गत विजेत्या शिवशक्ती महिला संघाचे आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यांत अमर हिंद मंडळ डॉ शिरोडकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध दोनहात करेल.

विशेष व्यावसायिक गटात महिंद्रा अँड महिंद्रा समोर भारत पेट्रोलियमचे कडवे आव्हान असणार आहे. एयर इंडिया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल.

#आज होणारे उपांत्य फेरीचे सामने.

#महाविद्यालीयन गट
१) सिद्धार्थ कॉलेज विरुद्ध ठाकूर कॉलेज
२) वंदे मातरम कॉलेज विरुद्ध महर्षी दयानंद कॉलेज

#व्यावसायिक अ श्रेणी गट
१) टी. बी. एम स्पोर्ट्स विरुद्ध शिवास एंटरप्राइज

२) भारत पेट्रोलियम (शिवडी) विरुद्ध इनकम टॅक्स

#महिला गट
१) विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशक्ती महिला संघ
२) डॉ. शिरोडकर स्पो. क्लब विरुद्ध अमर हिंद मंडळ

#विशेष व्यावसायिक पुरुष गट
१) भारत पेट्रोलियम विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा
२) महाराष्ट्र पोलीस विरुद्ध एयर इंडिया

You might also like