पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित पहिल्या पीवायसी-रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत अगस्त्य कुंटे(11, 14, 15मि.)याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर शिल्ड संघाने ऍव्हेंजर्स संघाचा 4-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.
कर्वे रोड येथील फुटसॉल ५ या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत 13 वर्षांखालील गटात दुसऱ्या सामन्यात आरुष देवधर(6, 13मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर ऍव्हेंजर्स संघाने गार्डीयन्स संघाचा 4-0 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
खुल्या गटात विश्व रुकारी(7, 8, 10, 15मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर आर्मडोज संघाने रेंजर्स संघाचा 6-1 असा धुव्वा उडवला. तर, जय जय जोशी(2, 12मि.), सोहम गांधी(3मि.)यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर वॉरियर्स संघाने रेबेल्स संघाचा 3-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. स्पार्टन्स संघाने वायकिंग्ज संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत शानदार सुरुवात केली. स्पार्टन्स संघाकडून यश परांजपे(3, 9, 22 मि.) याने सर्वाधिक तीन गोल केले. अन्य लढतीत प्रभांश माथरू(17मि.)याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर ग्लॅडीएटर्स संघाने टायटन्स संघाचा 1-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 13 वर्षांखालील गट:
ऍव्हेंजर्स: 4(संवित 4मि., आरुष देवधर 6, 13मि., स्वयंगोल 27 मि.)वि.वि.गार्डीयन्स: 0;
शिल्ड:4(अगस्त्य 11,14,15मि., रेवाश कासट 12 मि.)वि.वि.ऍव्हेंजर्स: 1(संवित कासट 17मि.);
खुला गट:
आर्मडोज: 6(अनिकेत जगताप 5मि., विश्व रुकारी 7, 8, 10, 15मि., श्रीनिवास चाफळकर 12मि,)वि.वि.रेंजर्स: 1(यश भिडे 4मि.);
वॉरियर्स: 3(जय जोशी 2, 12मि., सोहम गांधी 3मि.) वि.वि.रेबेल्स: 1(सिद्धार्थ बदामीकर 6मि.);
स्पार्टान्स: 5(यश परांजपे 3, 9, 22 मि., चिनार ओक 5मि.,अमित परांजपे 8मि.)वि.वि.वायकिंग्ज: 0;
ग्लॅडीएटर्स: 1(प्रभांश माथरू 17मि.)वि.वि. टायटन्स: 0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल
अँडरसनसोबत २०१४मध्ये झालेल्या वादाचे प्रत्यत्तुर जडेजाने तोंडाने नाहीतर बॅटने दिले