भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाते. तो सातत्याने छोट्या-मोठ्या गोष्टींवरून खेळाडूंशी वाद ओढताना दिसतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या पुनर्निधारित कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसादरम्यान विराटने पाकिस्तानी पंच अलीम डार यांच्याशी भिडला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, सामन्याच्या दुसऱ्या दिवसादरम्यान (०२ जुलै) मोहम्मद शमी (Mohammad Shami) गोलंदाजी करत असताना अचानक पंच अलीम डार (Umpire Alim Dar) यांनी हात पुढे करत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शमी (Mohammad Shami) वेगाने चेंडू फेकण्यासाठी पळाल्याने तो थांबू शकला नाही. अशात त्याने चेंडू फेकला. मात्र फलंदाजाने चेंडू सोडून दिला आणि तो मागे हटला.
हा प्रसंग इंग्लंडचा सलामीवीर ऍलेक्स लीस बाद झाल्यानंतर घडला. लीस बाद झाल्यानंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. तरीही पंचांनी सामना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शमी इंग्लंडच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. यावेळी स्ट्राईकवर झॅक क्राउली होता.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1543421039564111872?s=20&t=YkN6uThHoaQ8QgUxZU3AYA
शमीने त्याच्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली. तो चेंडू फेकण्यासाठी नॉन स्ट्राईकरपर्यंत पोहोचलाही होता. तितक्यात पंच अलीम डार यांनी त्यांचा हात पुढे करत त्याला थांबण्याचा इशारा केला. परंतु शमी इतक्या वेगाने धावत आला होता की, तो पुढे निघून गेला आणि चेंडू फेकला. मात्र पंचांनी गोलंदाजाला थांबवण्याचा इशारा केल्याने इंग्लंडचा फलंदाज क्राउले आपोआप मागे सरकला.
पंचांनी डेड बॉल केला करार
शमीच्या या चेंडूला पंच अलीम डार यांनी डेड बॉल दिले. या प्रसंगानंतर विराट कोहलीचा मात्र पारा चढला. तो त्वरित पंचांजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलताना दिसला. त्याच्यातील आणि पंचांमधील संभाषण स्टंप्स माईकमध्ये कैद झाले. पंचांनी शमीला अडवताच विराट मोठ्याने म्हणताना दिसला की, अरे, तुम्ही चेंडू फेकताना गोलंदाजांला मध्येच कसे अडवू शकता. यावर पंचांनी पावसामुळे सामना थांबवावा लागला, असे कारण सांगत विराटची समजूत काढली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल
अँडरसनसोबत २०१४मध्ये झालेल्या वादाचे प्रत्यत्तुर जडेजाने तोंडाने नाहीतर बॅटने दिले